Crime News | गोवा बनतेय ड्रग्स तस्करीचे प्रमुख केंद्र; हैदराबाद, तेलंगणासह मुंबईत हजारो ग्राहक असल्याचा संशय

Crime News | हैद्राबाद, तेलंगणासह मुंबईत हजारो ग्राहक असल्याचा तपासात संशय
Thane drug trafficking
Thane drug traffickingpudhari photo
Published on: 
Updated on: 

पणजी : विलास महाडिक
गोव्यात पर्यटकांची मोठी वर्दळ असल्याने मुंबई आणि हैदराबाद येथील ड्रग माफिया गोव्याचा विक्री केंद्र म्हणून वापर करत असल्याचे समोर आले आहे. नुकताच तेलंगणातील ईगल फोर्सने गोवा-हैदराबाद ड्रग कनेक्शनचा पर्दाफाश केला. हजारो ग्राहकांच्या संपर्कात असल्याचे समोर आलेल्या प्रीतेश, बशारथ आणि तरुण या त्रिकुटाला गोव्यात अटक केली.

Thane drug trafficking
URPro Card Goa Digital | यूआरप्रो कार्डसाठी केवळ 5 टक्के जमीनमालकांकडून कागदपत्रे सादर; पणजी, मडगावमधील सर्वेक्षणाचे वृत्त

गोव्याचे पर्यटन क्षेत्र आणि किनारी भाग ड्रग तस्करीचे अड्डे बनत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. गोवा पोलिस आणि तेलंगणा ईगल फोर्स यांच्या संयुक्त कारवाईला महत्त्व प्राप्त झाले असून, या रॅकेटमधील अन्य आरोपांचा शोध सुरू आहे.

हे त्रिकूट मूळचे हैदराबादचे असून, गोव्यात ड्रगला मागणी असल्याने त्यांनी येथे ठाण मांडले होते. आंध्र प्रदेशातील एक हजाराहून अधिक ग्राहकांशी, तर तेलंगणातील सुमारे ८०० ग्राहकांशी त्यांचा संपर्क असल्याचे जप्त केलेल्या मोबाईल फोनच्या तपासातून समोर आले.

गोवा, हैदराबाद आणि मुंबई पोलिस या रॅकेटचा समन्वयाने तपास करत आहेत.
प्रीतेश हा ग्राहक आणि छोट्या स्तरावरील ड्रग विक्रेत्यांच्या माध्यमातून ड्रगचा कथित पुरवठा करत असल्याचे पोलिस तपासात उघड झाले. या माफियांचे मुंबईतील कॉन्टॅक्ट समोर आले असून, त्याची पडताळणी सुरू आहे.

तेलंगणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हैदराबादच्या पंजागुट्टा पोलिसांनी आर. केशव राज सिंह याला ड्रग विक्री करताना रंगेहात पकडले होते. त्याच्या चौकशीत या रॅकेटचे धागेदोरे गोव्यापर्यंत पोहोचल्याचे उघड झाले. त्यानंतर या नेटवर्कच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी तेलंगणा पोलिसांनी गोवा पोलिसांच्या मदतीने संबंधित ड्रग विक्रेत्यांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे.

Thane drug trafficking
Nagali Hills Taleigao | नागाळी हिल्स-ताळगाव येथे शाब्दिक वादातून झालेल्या हल्ल्याप्रकरणी चार संशयितांना पणजी पोलिसांकडून अटक

आर्थिक पुरावेही हाती...

हैदराबाद पोलिसांच्या तपासात महत्त्वाचे आर्थिक पुरावे हाती लागले आहेत. संबंधित बँक खात्यांची छाननी करताना सुमारे ४८ लाख ४० हजार रुपयांचे ड्रगशी संबंधित संशयास्पद आर्थिक व्यवहार आढळून आले आहेत.

गोव्यातून हैदराबादला जाऊन ग्राहकांना ड्रग पुरवले जात असल्याचा संशय आहे. त्यानंतर मिळालेली रोख रक्कम संबंधित बँक खात्यांमध्ये जमा केली जात असल्याचे तपासात समोर आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news