

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोवा दंत महाविद्यालय व रुग्णालयात (जीडीसीएच) २०२५ या वर्षात दरमहा सरासरी १२ तोंडाच्या कर्करोगाच्या रुग्णांची नोंद झाली आहे. दरमहा सुमारे ४४ कर्करोगपूर्व तोंडातील जखमांचे निदान करण्यात आले आहे. तोंडातील कर्करोगपूर्व जखमा आणि तोंडाच्या कर्करोगाचे लवकर निदान, तपासणी व व्यवस्थापनासाठी जीडीसीएच हे राज्यातील तृतीयक सेवा केंद्र म्हणून कार्यरत आहे.
जीडीसीएचमधील महत्त्वाच्या प्रतिबंधात्मक सेवांपैकी तंबाखू सोडविण्याचे केंद्र हे एक असून, येथे तंबाखूचे व्यसन सोडण्यासाठी समुपदेशन केले जाते. तंबाखूच्या सेवनामुळे तोंडाचा कर्करोग, हिरड्यांचे आजार आणि दात गळण्याचा धोका लक्षणीयरीत्या वाढत असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
रुग्णालयात तोंडाच्या कर्करोगासाठी तपासणी, निदान, उपचार नियोजन, शस्त्रक्रिया तसेच कर्करोग उपचारापूर्वी दातांची तपासणी अशा सर्व सुविधा उपलब्ध आहेत. आरोग्य खात्याच्या कर्करोग निदान मोहिमेमुळे कर्करोगाच्या धोक्याच्या लक्षणांबाबत जनजागृती वाढली असून, नागरिक भीती आणि गैरसमज दूर करून मोफत तपासणी शिबिरांमध्ये सहभागी होत आहेत.
तोंडाच्या कर्करोगावर यशस्वी उपचार शक्य असून लवकर निदान झाल्यास रुग्णाचा जीव वाचू शकतो, असे जीएमसीचे समुदायिक वैद्यक विभागप्रमुख व कर्करोग निदान अभियानाचे नोडल अधिकारी डॉ. जगदीश काकोडकर यांनी सांगितले.
२०२६ च्या जानेवारी ते जून या कालावधीत जीडीसीएचमध्ये ३६२ कर्करोगपूर्व जखमांचे निदान करण्यात आले, तर तोंडाच्या कर्करोगाची नवीन व पाठपुराव्यासह ४९ प्रकरणे नोंदविण्यात आली. याच कालावधीत तंबाखू सोडण्याच्या शिबिरामध्ये ६१६ जणांनी सहभाग घेतला. २०२५ मध्ये एकूण ५२८ कर्करोगपूर्व जखमा, १४७ तोंडाच्या कर्करोगाची प्रकरणे आणि तंबाखू सोडण्याच्या शिबिरांमध्ये १५२६ जणांनी सहभाग नोंदविला होता.
तोंडात पांढरे किंवा लाल ठिपके दिसणे
तोंडातील बरा न होणारा व्रण
तोंडात कठीण गाठ किंवा सूज येणे
गळ्यात गाठ येणे
तोंड उघडण्यास किंवा गिळण्यास अडचण
जीभ किंवा तोंड सुन्न होणे
आवाजात सतत बदल किंवा घोगरेपणा
अकारण वजन घटणे
चवीमध्ये बदल जाणवणे
सर्व प्रकारच्या तंबाखूचे सेवन टाळा
मद्यपान टाळा
फळे व भाज्यांचा आहारात अधिक समावेश करा
दात व तोंडाची नियमित स्वच्छता राखा
टोकदार दात व अयोग्य बसणारी कवळी दुरुस्त करून घ्या
दातांची नियमित तपासणी करा
कवळी दररोज काढून स्वच्छ करा आणि दर पाच वर्षांनी तिची तपासणी करून घ्या.
लिप बाम व रुंद कडांची टोपी वापरून ओठांचे उन्हापासून संरक्षण करा
तंबाखू आणि मद्यपान एकत्र केल्यास तोंडाच्या कर्करोगाचा धोका अनेक पटींनी वाढतो, असा इशाराही डॉक्टरांनी दिला.
२०२५ (जानेवारी-डिसेंबर) : ५२८
२०२६ (जानेवारी-जून) : ३६२
२०२५ (जानेवारी-डिसेंबर) : १४७
२०२६ (जानेवारी-जून) : ४९
२०२५ (जानेवारी-डिसेंबर) : १५२६
२०२६ (जानेवारी-जून) : ६१