गोवा : राज्य निवडणूक आयुक्तपदी दौलत हवालदार निश्चित

मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब
Daulat Hawaldar appointed
दौलत हवालदार यांची राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तपदी निवड निश्चित मानली जात आहे. Pudhari News Network

पणजी, पुढारी वृत्तसेवा : गोव्याचे निवृत्त आयएएस अधिकारी दौलत हवालदार यांची राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तपदी निवड निश्चित मानली जात आहे. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भातील प्रस्ताव सादर करण्यात आला. विद्यमान आयुक्त डब्ल्यू. व्ही. रमणमूर्ती यांचा कार्यकाळ ४ जुलै रोजी संपुष्टात आलेला आहे. त्यानंतर राज्य सरकारने राज्य निवडणूक आयोगावर नव्या आयुक्तांची नेमणूक करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. या पदासाठी दौलत हवालदार यांचे नाव निश्चित झाले आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत या नावावर शिक्कामोर्तब झाले. 

Daulat Hawaldar appointed
गोवा : खारेबांद येथे घराची भिंत कोसळली; गोठ्यात दूध काढायला गेल्याने वाचला जीव

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news