गोवा : खारेबांद येथे घराची भिंत कोसळली; गोठ्यात दूध काढायला गेल्याने वाचला जीव

एका इमारतीसमोर दरड कोसळल्याने चौघांचे स्थलांतर
The wall of the house collapsed at Khareband
खारेबांद येथे घराची भिंत कोसळली

मडगाव : तळसाझर येथे घराची भिंत कोसळून अठरा वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी (दि.१८) खारेबांद येथे इम्यॅन्यूल पिंटो यांच्या घराची भिंत कोसळली. त्याच वेळी इम्यॅन्यूल आणि त्यांचा भाऊ दूध काढण्यासाठी गोठ्यात गेल्यामुळे ते बचावले.

The wall of the house collapsed at Khareband
कोल्हापूर : भाततळी येथे मुसळधार पाऊस; टॉवर कोसळला

गोव्यात गेले अनेक दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडत आहेत. पिंटो यांचा दुधाचा व्यवसाय आहे. दररोज पहाटे ते घराजवळील गोठ्यात जाऊन म्हशीचे दूध काढून त्याची विक्री करतात. त्यावरच त्यांची उपजिविका चालते. गुरुवारीही नेहमीप्रमाणे ते दोघेही पहाटे चार वाजता उठून गोठ्यात गेल्यानंतर काही क्षणात घराची भिंत कोसळली. याच भिंतीजवळ त्यांचा भाऊ झोपला होता. ते दोघेही गोठ्यात गेल्याने सुदैवाने अनर्थ टळला. स्थानिक नगरसेवक महेश आमोणकर आणि योगीराज कामत यांनी पाहणी केली.

The wall of the house collapsed at Khareband
Irshalwadi Landslide Incident : मुसळधार पाऊस, अरुंद पायवाट, रात्रीचा अंधार; गिरीश महाजनांनी सांगिलता इरसाळवाडी गावातील थरार

विमल शिरोडकर यांचे खारे बांध येथील घर सोमवारी (दि.१५) कोसळले होते. यावेळी त्या बिस्कीट आणण्यासाठी दुकानात गेल्याने त्यांचा जीव वाचला. त्यानंतर खारेबांद येथे दुसर्‍या दिवशी एका ९२ वर्षीय वृध्द महिलेवर घराचे छप्पर कोसळले. त्यात तिचा हात फ्रॅक्चर झाला असून तिच्या डोक्याला जखम झाली. तिच्यावर गेल्या चार दिवसांपासून दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात उपचार सुरू आहेत. बुधवारी फातोर्डा येथे तळसा झर परिसरात मातीचे घर कोसळून मूळ उत्तर प्रदेश येथील कार्तिक चव्हाण याचा मृत्यू झाला होता. त्याचे वडील दिग्विजय हे गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात उपचार सुरू आहे. दरम्यान, मार्ले बोर्डा येथे एका इमारतीसमोर दरड कोसळल्याने चौघांना स्थलांतरित करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news