Boat Owner Murder Case | गोवा हादरला! मासेमारी बोट मालकाची समुद्रातच निर्घृण हत्या; ओडिसाच्या कामगारांनी मृतदेह पाण्यात फेकला

Boat Owner Murder Case | वास्कोतील घटना : मृतदेह दिला समुद्रात फेकून
murder case
murder casePudhari
Published on
Updated on

दाबोळी : पुढारी वृत्तसेवा

मासेमारीसाठी गेलेल्या बोट मालक मंजुनाथ हरिकांत यांचा खारीवाडा परिसरात समुद्रात मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली असता हरिकांत यांची त्यांच्याच बोटीवर काम करणाऱ्या ओडिशातील कामगारांनी हत्या केली व मृतदेह समुद्रात फेकून दिल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले.

murder case
Supriya Sule Goa Meeting | खासदार सुळे यांच्यासोबतच्या बैठकीत ठरली रणनीती

याप्र-करणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संशयित सुरू आहे. मंजुनाथ हरिकांत कामगारांचा शोध पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंजुनाथ हरिकांत हे नेहमीप्रमाणे ओडिशा येथील काही कामगारांना सोबत घेऊन मासेमारीसाठी समुद्रात गेले होते. मात्र, या प्रवासादरम्यान समुद्रातच मालक आणि कामगारांमध्ये काही क्षुल्लक कारणांवरून वाद झाला.

या वादाचे रूपांतर हिंसेत झाले आणि कामगारांनी एकत्र येऊन मंजुनाथ यांच्या डोक्यावर जड वस्तूने जोरदार प्रहार केला. हा हल्ला इतका भीषण होता की मंजुनाथ यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर गुन्हा लपवण्यासाठी संशयितांनी मंजुनाथ यांचा मृतदेह थेट समुद्रात फेकून दिला. त्यानंतर संशयितांनी मासेमारीची बोट किनाऱ्यावर आणली आणि जेटीवर नांगरून उभी केली आणि आपल्या बॅगा घेवून आपल्या गावी पळ काढला.

murder case
Goa Forward | गोवा फॉरवर्ड पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत

१ जून पासून मान्सून काळातील मासेमारी बंदी लागू झाल्याने किनाऱ्यावर अनेक बोटी उभ्या आहेत. त्यामुळे सुरुवातीला कोणालाही संशय आला नाही. मात्र, समुद्रात हरिकांत यांचा मृतदेह तरंगताना आढळला. त्यांच्या शरीरावर गंभीर मारहाणीच्या खुणा आढळल्याने पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून संशयितांचा शोध घेण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news