Nilesh Cabral | उमेदवारीवरून काब्राल पुन्हा आक्रमक

Nilesh Cabral | तिकीट नाकारल्यास जनतेच्या निर्णयानुसार भूमिका ठरविण्याची भूमिका | नीलेश काब्राल हे 'धुरंधर पार्ट 2'
Goa BJP MLA Nilesh Cabral
Goa BJP MLA Nilesh Cabral
Published on
Updated on

मडगाव / पणजी : पुढारी वृत्तसेवा
कुडचडे मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारीवरून सुरू असलेल्या चर्चेला आमदार नीलेश काब्राल यांनी पुन्हा तोंड फोडले आहे. आपण कोणतेही चुकीचे विधान केले नसून, पक्षाच्या कार्यक्रमांच्या बॅनरवर स्थानिक आमदार म्हणून आपला फोटो वगळला जात असताना त्याची दखल घेतली जात नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.

Goa BJP MLA Nilesh Cabral
Goa News | गोव्यातील मडगाव, पणजी अन् वास्को कदंब बसस्थानकांचा कायापालट होणार; उल्हास तुयेकर यांची घोषणा

भाजपची उमेदवारी आपल्यालाच मिळेल, याबाबत शंका नसल्याचे सांगतानाच, यदाकदाचित उमेदवारी नाकारली तर कुडचडेची जनता सांगेल तो निर्णय घेईन, असे काब्राल यांनी स्पष्ट केले.
काब्राल यांच्या यापूर्वीच्या उमेदवारीविषयक विधानावर प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी पक्षश्रेष्ठींसमोर विषय मांडण्याचे संकेत दिले होते.

त्यावर प्रतिक्रिया देताना काब्राल म्हणाले की, भाजपचा कार्यकर्ता म्हणून १७ वर्षे प्रामाणिकपणे काम केले आहे. पक्षाच्या बॅनरवर राष्ट्रीय व राज्यातील नेत्यांचे फोटो लावून स्थानिक आमदाराचा फोटो वगळणे योग्य नाही. याबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे यापूर्वीच तक्रार केली होती, मात्र दखल घेतली नाही.

आपण भाजपचे कट्टर कार्यकर्ते असून पक्ष सोडणार नाही, मात्र आपणही माणूस असून, भावना आहेत, असे काब्राल म्हणाले. आपल्या विधानाचा विपर्यास झाला असून पक्षावर दबाव टाकण्याचा हेतू नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले. पक्षाने आपल्याला आमदार व मंत्री केले असून, आपण आजही पक्षासाठीच काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची यावेळीही स्क्रिप्ट तयार


पक्षांतराच्या मुळाशी २०२२ मध्ये आमदार मायकल लोबो होते, २०२७ मध्ये आमदार नीलेश काब्राल असणार आहेत. लोबो हे 'धुरंधर १' होते, तर काब्राल हे 'धुरंधर २' आहेत. पक्षांतराची पटकथा आणि दिग्दर्शन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे असून, तोच चित्रपट, तीच पटकथा, तीच योजना सध्या सुरू आहे, असे वक्तव्य काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान केले.

Goa BJP MLA Nilesh Cabral
Ganpati Special Trains 2026: गणपतीसाठी मडगाव व कुर्ला येथून विशेष गाड्या

पाटकर म्हणाले की, भाजपचे आणि काब्राल यांच्यात काहीही वितुष्ट नाही. २०२२ मध्ये लोबो यांना भाजपनेच काँग्रेसमध्ये पाठवले होते. तेव्हा लोबो भाजपबद्दल असेच वाईट बोलायचे, आपल्याला उमेदवारी मिळणार नाही म्हणायचे. पण, शेवटी काय झाले? ते पुन्हा भाजपमध्ये गेले आणि काँग्रेसमधील अनेकांना घेऊन गेले. तो चित्रपट 'धुरंधर १' होता. आता 'धुरंधर २' येणार असून काब्राल यांचा वापर करून भाजप २०२७ मधील पक्षांतराची तयारी करीत आहे, असा घणाघाती आरोपही पाटकर यांनी केला. गोमंतकीय तिसऱ्यांदा पक्षांतराचा डाव हाणून पाडतील असे ते म्हणाले.

... तर मी अपक्ष लढेन

पक्षांतराची स्क्रिप्ट यशस्वी व्हायला हवी, तर काब्राल यांना काँग्रेसने उमेदवारी द्यायला लागेल. मग तुम्ही कुठल्या पक्षाची उमेदवारी घेणार असे विचारले असता पाटकर म्हणाले की, राजकारणात मी लोकांसाठी आलो आहे. माझ्यासाठी लोक सर्वोच्च आहेत. गरज पडल्यास मी अपक्ष निवडणूक लढवेन.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news