Curchorem Municipal Election | कुडचडेच्या राजकारणात गुलाबी द्विस्ट

Curchorem Cacora Municipal Election | नगरसेवकांच्या लीलांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा : राजकीय पक्षांची सावध भूमिका
Election process
Election processPudhari
Published on
Updated on

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

कुडचडे-काकोडा पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. पालिकेवर स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी विविध नेत्यांकडून जोरदार हालचाली सुरू असतानाच काही विद्यमान नगरसेवकांच्या कथित 'गुलाबी लीलों'ची चर्चा समाजमाध्यमांवर रंगू लागल्याने राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

Election process
PM Modi Goa Visit : पंतप्रधान मोदींचा सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये गोवा दौरा

कुडचडे-काकोडा नगरपालिका मंडळाचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने आता नवीन मंडळाच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. पालिका निवडणुकीबरोबरच आगामी विधानसभा निवडणुकीचेही बिगुल कोणत्याही क्षणी वाजू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे पालिका निवडणूक ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची लढत न राहता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शक्तिपरीक्षा मानली जात आहे.

कुडचडे मतदारसंघात भाजपचे आमदार नीलेश काब्राल यांचे वर्चस्व असले तरी यंदा त्यांच्यासमोर अनेक आव्हाने उभी राहत आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत अमित पाटकर यांनी त्यांना जोरदार टक्कर दिली होती. आता बीसीसीआयचे रोहन गावस देसाई माजी सरचिटणीस रोहन गावस देसाई यांच्याकडूनही काब्राल यांना कडवे आव्हान मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

विविध सामाजिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा आणि शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून दोन्ही नेते मतदारसंघात स्वतःचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसत आहेत. या वाढत्या राजकीय स्पर्धेमुळे नगरसेवक, स्थानिक पदाधिकारी आणि पक्षातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांना सुगीचे दिवस आल्याची चर्चा रंगू लागली आहे.

विविध गर्टाकडून कार्यकत्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी हालचाली सुरू असून, पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आणखी तापू लागले आहे. पालिका निवडणुकीत स्वतःचे पॅनल निवडून आणण्यासाठी संभाव्य उमेदवारांकडून विद्यमान नगरसेवकांना आपल्या गोटात ओढण्याचे प्रयत्न गेल्या काही महिन्यांपासून सुरू होते. अनुभवी नगरसेवकांच्या माध्यमातून पालिकेवर सत्ता मिळवून आगामी विधानसभा निवडणुकीत स्वतःचे राजकीय वजन वाढवण्याचे अनेकांचे गणित आहे. स्वतःचा राजकीय दबदबा निर्माण करण्यासाठी काही नगरसेवकांचे सर्व लाड पुरवले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

Election process
Goa - राज्यात प्रतिदिन सात रस्ते अपघात, रेंट-ए-कार व बाईक; भाडेतत्त्वावरील वाहनांमुळे रस्ते 'मृत्यूचे सापळे'

मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर काही नगरसेवकांची कथित विलासी आणि खासगी प्रकरणे चर्चेत आल्याने इच्छुक उमेदवारांच्या अडचणी वाढल्या आहेत. समाजमाध्यमांवर फिरणाऱ्या व्हिडिओंमुळे कुडचडे मतदारसंघात मोठी खळबळ उडाली आहे. याआधी अल्पवयीन मुलींच्या अश्लील व्हिडिओ प्रकरणामुळेही या मतदारसंघाची बदनामी झाली होती. त्या प्रकरणात क्राईम ब्रँचकडून आरोपपत्र दाखल करण्यात आल्याने वातावरण आधीच तापलेले असताना आता विद्यमान नगरसेवकांशी संबंधित नव्या चर्चामुळे राजकीय पक्ष सावध झाले आहेत.

विधानसभेत बहुरंगी लढत शक्य...

कुडचडे मतदारसंघात भाजप, काँग्रेस, आम आदमी पक्ष, गोवा फॉरवर्ड आदी पक्षांकडून चाचपणी सुरू आहे. नगरपालिकेतील काब्राल यांचे कट्टर विरोधक बाळकृष्ण होडरकर यांचे नावही चर्चेत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत बहुरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत पालिकेवर स्वतःचे पॅनल निवडून आणणे हे प्रत्येक राजकीय गटासाठी प्रतिष्ठेचे ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news