Goa|मिनी बस-जीप धडकेत १६ जण जखमी

नानोडा येथे अपघात; दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान
Goa
नानोडा येथे अपघातग्रस्त मिनी बस व थार वाहन.
Published on
Updated on

डिचोली : डिचोली तालुक्यातील नानोडा येथे रविवारी खासगी मिनी बस आणि जीप वाहनामध्ये समोरासमोर भीषण अपघात होऊन १६ प्रवासी जखमी झाले. अपघाताची तीव्रता मोठी असून दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

Goa
धारबांदोड्यात आढळला मृत वाघ; आगलोट - साकोर्डा येथील घटना

मिळालेल्या माहितीनुसार, अस्नोडा येथून इब्रामपूरकडे प्रवासी घेऊन जाणाऱ्या मिनी बसला समोरून येणाऱ्या थार वाहनाने जोरदार धडक दिली. अपघातावेळी बसमध्ये सुमारे २५ ते ३० प्रवासी होते. जखमींना तातडीने डिचोली येथील सामाजिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर काही जखमींना घरी सोडण्यात आले, तर एका जखमीची प्रकृती गंभीर असल्याने त्याला बांबोळी येथील गोमेको रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Goa
धारबांदोड्यात आढळला मृत वाघ; आगलोट - साकोर्डा येथील घटना

तसेच तीन जखमींवर डिचोली सामाजिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच आमदार डी. चंद्रकांत शेट्ये यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींची विचारपूस केली, दरम्यान, डिचोली पोलिसांनी अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे.

Goa
Goa | वॉरेन आलेमाव, गिरीश चोडणकर यांची चौकशी

पोलिसांनी गस्त वाढवावी

लार्टबार्से पंचायत क्षेत्रात अनेक फार्महाऊस असल्याने आठवड्याच्या शेवटी बाहेरगावाहून मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. पार्टी करून परतताना काहीजण मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. शनिवार-रविवारी पोलिसांनी गस्त वाढवावी आणि नशेत वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news