Jerry Alex Bail Denied | अमली पदार्थ प्रकरणातील संशयित जेरी अॅलेक्सचा जामीन अर्ज चौथ्यांदा फेटाळला

Jerry Alex Bail Denied | मेरशी येथील विशेष न्यायालयाने व्यावसायिक प्रमाणातील एलएसडी द्रवपदार्थप्रकरणी कोठडीत गिनी देशाच्या नागरिक संशयित जेरी अॅलेक्स याला चौथ्यांदा जामीन नाकारला.
Court
CourtPudhari
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

मेरशी येथील विशेष न्यायालयाने व्यावसायिक प्रमाणातील एलएसडी द्रवपदार्थप्रकरणी कोठडीत गिनी देशाच्या नागरिक संशयित जेरी अॅलेक्स याला चौथ्यांदा जामीन नाकारला. पंच साक्षीदाराने छाप्यावेळी आरोपी घटनास्थळी उपस्थित असल्याची ओळख पटविल्याचे न्यायालयाने नोंदवले.

Court
Matru Pitru Pujan Diwas Nashik|नाशिकमध्ये व्हॅलेंटाइन डे नाही, तर मातृ-पितृदिन

तसेच आरोपीचा दुसऱ्या व्यावसायिक प्रमाणातील अमली पदार्थ प्रकरणातील कथित सहभागही जामीन नाकारण्यास कारणीभूत ठरल्याचे सांगत न्यायालयाने चौथ्यावेळी जामीन अर्ज फेटाळला. बेरोजगार असलेला ४६ वर्षाचा संशयित जेरी अॅलेक्स याला ३० सप्टेंबर २०२१ रोजी कांदोळी येथील त्याच्या निवासस्थानी छापा टाकून अमली पदार्थ विरोधी कक्षाच्या पोलिसांनी अटक केली होती.

त्याच्या ताब्यातून ४.१८ ग्रॅम एलएसडी द्रवपदार्थ जप्त करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याच्यावर एनडीपीएस कायद्याच्या कलम २२ (क) अंतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. अॅलेक्स हा व्यवसाय व्हिसावर भारतात आला होता आणि २०२१ मध्ये त्याच्या अटकेची माहिती गिनी दूतावासाला देण्यात आली होती.

Court
Panjim Municipal Corporation Reservation | पणजी महापालिका निवडणुकीचे प्रभाग आरक्षण जाहीर

पुढे हे प्रकरण नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) गोवा यांच्याकडे सोपवण्यात आले. संशयित जेरी अॅलेक्स याला यापूर्वीही ड्रग्जप्रकरणी अटक झाली होती. या प्रकरणात त्याला जामीन मिळाल्यावर पुन्हा तो ड्रग्ज व्यवसायात गुंतला होता. तो विदेशी नागरिक असल्याने त्याच्याकडे कोणताही वैध व्यवसाय नाही.

त्यामुळे त्याला जामीन मिळाल्यास पुन्हा तो ड्रग्ज व्यवसायत गुंतू शकतो किंवा पळून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी बाजू सरकारी वकील समीर तळेगावकर यांनी मांडली. संशयिताला खोट्या प्रकरणात गोवण्यात आले आहे तसेच खटल्याची सुनावणी अत्यंत संथगतीने सुरू असून १७ साक्षीदारांपैकी केवळ तीन साक्षीदारांची तपासणी झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news