Girish Chodankar | महिलांना 50 टक्क्यांपर्यंत उमेदवारी देणार

Girish Chodankar | प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर : पेडण्यात काँग्रेस मेळाव्यात घोषणा
Girish Chodankar Goa
Girish Chodankar Goa
Published on
Updated on

पेडणे : पुढारी वृत्तसेवा

काँग्रेस पक्ष महिलांच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध असून केवळ ३३ टक्के आरक्षणापुरते मर्यादित न राहता, सक्षम आणि कार्यक्षम महिला उमेदवार असतील तर त्यांना वेळप्रसंगी ५० टक्क्यांपर्यंत उमेदवारी देण्यासही काँग्रेस पक्ष मागे-पुढे पाहणार नाही, अशी घोषणा गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली.

Girish Chodankar Goa
Nanded MLC Election Result : काँग्रेसने राखलेल्या 'कुळा'वर भाजपाचा प्रथमच ताबा !

पेडणे मतदारसंघातील काँग्रेस समर्थकांच्या मेळाव्यानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. भाजपविरोधी सर्व शक्तींनी एकत्र येऊन काँग्रेसला बळ द्यावे, असे आवाहन करताना चोडणकर म्हणाले की, पक्षापासून विविध कारणांनी दूर गेलेले अनेक नेते व कार्यकर्ते पुन्हा काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहेत.

भाजपविरोधी विचार असलेल्या प्रत्येकाचे काँग्रेसमध्ये स्वागत केले. जाईल. राज्यात भाजपविरोधी वातावरण निर्माण करून जनविरोधी सरकारला सत्तेबाहेर करण्यासाठी सर्व विरोधी पक्ष आणि कार्यकर्त्यांनी संघटित होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षप्रवेशाबाबत काँग्रेसने स्पष्ट निकष निश्चित केल्याचे सांगताना त्यांनी पक्षाशी बेईमानी करणारे तसेच गंभीर गुन्हे किंवा बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

Girish Chodankar Goa
Goa: बाणावली मतदारसंघात पुन्हा काँग्रेस-आप लढत?

इच्छुकांनी प्रथम संबंधित मतदारसंघातील गट विकास समितीकडे संपर्क साधावा. त्यानंतर जिल्हा समिती आणि प्रदेश समितीमार्फत प्रस्तावाचा विचार करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड यांच्यात आघाडी होण्याचे संकेत देताना चोडणकर म्हणाले की, येत्या काळात काँग्रेसचे वरिष्ठ नेते गोवा फॉरवर्डच्या नेतृत्वाशी चर्चा करून पुढील रणनीती निश्चित करतील. यावेळी गोवा प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा प्रतीक्षा खलप, डॉ. अंजली निंबाळकर तसेच काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

महिलांनी क्षमता सिद्ध करावी...

महिलांच्या राजकीय सहभागावर भर देताना त्यांनी सांगितले की, केवळ आरक्षण देऊन थांबण्यापेक्षा सक्षम, कार्यक्षम आणि जनाधार असलेल्या महिलांना अधिकाधिक संधी देण्याची काँग्रेसची भूमिका आहे. महिलांनी आतापासूनच आपल्या मतदारसंघात नेतृत्व विकसित करून जनतेमध्ये सक्रियपणे काम करावे आणि स्वतःची क्षमता सिद्ध करावी, असे आवाहन त्यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news