Goa Colvale Jail Crime Branch Raid-कोलवाळ कारागृहात क्राईम ब्रँचचा छापा

कैद्यांच्या खोल्यांमधून पाच मोबाईल केले जप्त
prison
prison
Published on
Updated on

पणजी : ड्रग्ज तस्करीप्रकरणी नेहमीच वादग्रस्त ठरतलेल्या कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात शुक्रवारी तुरुंग महानिरीक्षकांनी पोलिसांच्या मदतीने कारागृहात छापा टाकला. या छाप्यावेळी दोन वेगळ्या कैद्यांच्या खोल्यांमधून पाच मोबाईल जप्त करण्यात आले. सध्या ड्रग्ज तस्करी प्रकरण गाजत असल्याने कारागृहात ड्रग्ज छापेमारीत सापडला नसल्याची माहिती सूत्राने दिली.

prison
युती स्थगितच; गाव तिथे मी! विजय सरदेसाई यांची स्पष्टोक्ती : वीरेश काँग्रेसशी चर्चा करणार

तुरुंग महानिरीक्षकाचा ताबा असलेले पोलिस महानिरीक्षक ए. के. चौरासिया यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपमहानिरीक्षक वेदप्रकाश वर्मा व क्राईम ब्रँचचे अधीक्षक राहुल गुप्ता, तसेच क्राईम ब्रँचच्या पथकाने कारागृहातील कैद्यांच्या खोल्यांची झडती घेतली. यावेळी बलात्कार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या कैद्याच्या खोलीत तीन मोबाईल मिळाले.

या कैद्याचे जीएचआरडीच्या सुरक्षा रक्षक व सध्या अटकेत असलेल्या आशा चोडणकर हिच्याशी संगनमत होते, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे तो असलेल्या खोलीची कसून तपासणी करण्यात आली. त्यानंतर तपास पथकाने कारागृहातील औषधे असलेल्या खोलीची तपासणी केली. संशयित आशा चोडणकर ही या ठिकाणी तस्करी केलेला ड्रग्ज कैद्यांकडे सोपवत होती व तेथून कैद्यांपर्यंत या औषधालयात काम करत असलेल्या एका कैद्याकडून पोहोचत होता, अशी माहिती समोर आल्याने ही छापेमारी करण्यात आली.

prison
मूळ गोवेकरांना घरे मिळणार : आरोलकर

या कैद्याची चौकशीही वरिष्ठांकडून करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांत सीसीटीव्ही कॅमेरामधील काही संशयास्पद हालचालींचाही आढावा घेण्यात आला असल्याची माहिती या सूत्राने दिली.

कसून तपासणी करण्याचे निर्देश

तुरुंग महानिरीक्षक ए. के. चौरासिया यांनी कारागृह प्रवेशद्वारावर असलेल्या पोलिस सुरक्षा रक्षकांना कसून तपासणी करण्याचे निर्देश दिले. कारागृहात ड्रग्ज पोहोचवण्यास काही कर्मचारीच सामील असल्याने त्यांची तपासणी करण्याचे तसेच कारागृहातील हालचालींवर लक्ष ठेवण्याचे निर्देश जेलर, तसेच तुरुंग अधीक्षक व साहाय्यक अधीक्षकांना दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news