Goa Rent A Car Accident | कोलव्यात रेंट अ कारचा मध्यरात्री थरार

Goa Rent A Car Accident | तिघे दुचाकीस्वार बचावले; निष्काळजी वाहनचालकाचा कहर
Goa Rent A Car Accident
Goa Rent A Car Accident
Published on
Updated on

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

गोव्यात भाडेतत्त्वावरील (रेंट-अ-कार) वाहनांमुळे घडणाऱ्या अपघातांच्या घटना आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन सातत्याने वाढत असल्याचे चित्र समोर येत असताना रविवारी मध्यरात्री कोलवा येथे आणखी एक धक्कादायक प्रकार घडला.

Goa Rent A Car Accident
Goa ST Reservation: "एसटींना तत्काळ राजकीय आरक्षण द्या"; भाजप शिष्टमंडळाची मुख्य निवडणूक अधिकारी संजय गोयल यांच्याकडे मागणी

महाराष्ट्र राज्यात नोंदणीकृत असलेल्या ८१० क्रमांकाच्या भाड्याच्या थार वाहनाने भरधाव वेगात आणि बेदरकारपणे वाहन चालवून तिघा दुचाकीस्वारांच्या जीवाला धोका निर्माण केल्याची घटना घडली. सुदैवाने मोठा अपघात टळला आणि तिन्ही दुचाकीस्वार थोडक्यात बचावले.

शुक्रवारी उत्तर गोव्यातील शिवोली येथील ३२ वर्षीय संकेत दाभोलकर यांचा एका भाड्याच्या थारने दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना अद्याप ताजी असतानाच कोलव्यातील हा प्रकार समोर आल्याने संताप व्यक्त होत आहे.

Goa Rent A Car Accident
Jalgaon Cattle Smuggling : गोवंश तस्करांचे धाबे दणाणले; ७८ जनावरांची सुटका, १४ वाहने ताब्यात अन् २४ गुन्हे दाखल

रविवारी मध्यरात्री संबंधित थार वाहनातून मोठ्या आवाजात संगीत वाजविले जात होते. वाहनातील तिन्ही युवक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

POLICE कोलवाच्या दिशेने जाणाऱ्या तीन दुचाकीस्वारांना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात थार चालकाने अत्यंत बेफिकीरपणे वाहन चालवले. एका क्षणी या वाहनाने दुचाकींना धडक देण्याची परिस्थिती निर्माण झाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news