Coal Pollution | कोळशाच्या प्रदूषणाला आमोणकर जबाबदार

Coal Pollution | खासदार संजय सिंह : वाहतूक बंद करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांची भेट घेणार
Coal Pollution
Coal Pollution
Published on: 
Updated on: 

मुरगाव : पुढारी वृत्तसेवा

मंत्री संकल्प आमोणकर यांच्या पक्षांतरामुळे मुरगावमधील नागरिकांना कोळशाच्या धुळीच्या प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी केला.

Coal Pollution
Goa Accident News | मुरगाव हार्बर महामार्गावर भीषण अपघात; सिमेंट मिक्सरच्या धडकेत महिला जागीच ठार

काँग्रेसच्या तिकिटावर निवडून येताना कोळशाची वाहतूक बंद करण्याचे आश्वासन देणाऱ्या आमोणकर यांनी वैयक्तिक फायद्यासाठी भाजपमध्ये प्रवेश करून जनतेचा विश्वासघात केल्याची टीकाही त्यांनी केली. यावेळी 'आप'च्या महिला आघाडीच्या अध्यक्षा ममता नाईक मेबेन आणि प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक उपस्थित होते.

ते म्हणाले, कोळशाच्या धुळीमुळे मुरगावसह गोव्यातील अनेक भागांतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरातील अमोनिया गॅस साठवण टाकीमुळेही सुरक्षिततेचा धोका असल्याचे सिंह यांनी सांगितले. राज्य आणि केंद्र सरकार या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

Coal Pollution
Mormugao Port | मुरगाव बंदरावरून 74,766 पर्यटकांचे गोव्यात आगमन; 2024-25 मध्ये दाखल झाली 44 क्रूज जहाजे

केंद्रीय जहाजबांधणी मंत्री सरबानंद सोनोवाल यांची भेट घेण्यासाठी वेळ मागणार असून, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी, वाल्मिकी नाईक, ममता नाईक मेबेन आणि सुनील लॉरेन्स यांच्यासह शिष्टमंडळ भेट घेणार आहे.

आगामी संसदेच्या अधिवेशनातही हा प्रश्न उपस्थित करणार असल्याचे सिंह यांनी स्पष्ट केले. पक्षांतरावर टीका करताना त्यांनी आगामी निवडणुकीत भाजपबरोबरच मतदारांचा विश्वासघात करणाऱ्या काँग्रेसलाही धडा शिकवण्याचे आवाहन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.