

पणजी ः पर्वरी येथील मंत्रालयात बुधवारी झालेल्या गोवा राज्य प्राणी कल्याण मंडळाच्या बैठकीत राज्यभरातील प्राणी कल्याण यंत्रणा अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, पशुसंवर्धन मंत्री नीळकंठ हळर्णकर व पशुसंवर्धन खात्याचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
या बैठकीत झालेल्या प्रमुख निर्णयात रस्त्यावर फिरणाऱ्या गुरांना कायदेशीर आणि मानवीय पद्धतीने जप्त करण्यास मदत करण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांची तैनाती करण्यात येईल, तसेच पाळीव कुत्र्यांची सक्तीने नसबंदी आणि लसीकरण करण्यासाठी अधिसूचना जारी केली जाईल, दुर्गम भागात सेवा पुरवण्यासाठी मोबाईल नसबंदी युनिट्स सुरू केली जातील. नियमन, शोधण्यायोग्यता आणि प्राणी कल्याण नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी पशुसंवर्धन खात्याकडे मांस व्यापाऱ्यांची नोंदणी अनिवार्य करण्यात येईल, आदी निर्णय घेण्यात आले.ॉ
राज्यातील पंचायतींनी रस्त्यावरील भटकी गुरे पकडून ती गोशाळांत नेण्यासाठी गोशाळांच्या कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी करार करण्याची जी सूचना राज्यातील पंचायतींना केली होती, त्यात चांगले यश आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.