CM Pramod Sawant | एक लाख गोमंतकीयांना 'माझे घर'

CM Pramod Sawant | मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत : उत्तर गोव्यातही लवकरच सनदा वितरण
CM Pramod Sawant
CM Pramod Sawant
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

गोवा सरकारने सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी अशा माझे घर योजनेचा लाभ राज्यातील १ लाख गोमंतकीयांना मिळणार आहे. दक्षिण गोव्यात नुकतेच या योजने अंतर्गत सनदांचे वितरण करण्यात आले, आता उत्तर गोव्यातही लवकरच सनदा वितरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

CM Pramod Sawant
Maje Ghar Yojna | 'माझे घर' च्या हजार सनदांचे आज वितरण

मुख्यमंत्र्यांनी शनिवारी आभासी पद्धतीने राज्यातील पंच व नगरसेवकांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. ज्या लोकांनी अद्याप अर्ज केले नाहीत, त्यांनी आवश्यक ती कागदपत्रे जमा करून अर्ज करावेत, असे आवा हनही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.

राज्यातील १ लाख लोकांची घरे नियमित करून त्यांना १०० टक्के माझे घर योजनेचा लाभदेण्याचे सरकारचे ध्येय असल्याचे सांगून बेकायदेशीर घरे नव्हे, तर गोवेकरांची अनियमित घरे नियमित करण्यासाठी माझे घर ही योजना असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

विरोधकांच्या अफवांकडे दुर्लक्ष करा : मुख्यमंत्री

विरोधकांनी या योजनेबाबत कितीही अफवा पसरविल्या तरी लोकांनी त्याकडे लक्ष देऊ नये. परप्रांतीयांची घरे सरकार कायदेशीर करत नाही, तर गोव्यातील जुनी घरे जी काही कागदपत्रांच्या उणिवांमुळे अनियमित राहिली होती, ती घरे नियमित करण्यासाठीच माझे घर योजना सरकारने आणलेली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news