

म्हापसा : पुढारी वृत्तसेवा : कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात कैद्यांच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी होऊन काही कैदी जखमी झाल्याची घटना घडली आहे. या संदर्भात 'दै. पुढारी'ने 'कोलवाळ तुरुंगातून धमकीचे व्हिडिओ' या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून तुरुंगातील संभाव्य स्थितीबाबत भीती व्यक्त केली होती. ती खरी ठरली आहे.
यापूर्वीही तुरुंगात अशा मारामारीच्या घटना घडल्या होत्या. कुख्यात टारझन गँग व कारबोटकर गँग या दोन गँगमधील गटांत हाणामारी झाल्याची माहिती मिळाली असून तुरुंग अधिकार्यांनी व पोलिसांनी तुरुंगात धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
हेही वाचा