गोवा: म्हापशाचे नगरसेवक तारक आरोलकर अपात्र | पुढारी

गोवा: म्हापशाचे नगरसेवक तारक आरोलकर अपात्र

म्हापसा : पुढारी वृत्तसेवा : म्हापसा नगरपालिकेचे नगरसेवक तारक आरोलकर (Tarak Arolkar) यांना नगरविकास खात्याच्या संचालकांनी नगरसेवक म्हणून अपात्र घोषित केले आहे. बनावट जातीचा दाखला सादर केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

तारक आरोलकर म्हापसा नगर पालिकेच्या प्रभाग ७ मधून ओबीसी राखीव प्रभागातून निवडणूक लढवून विजयी झाले होते. त्यांनी बनावट जन्म दाखल्याद्वारे जात प्रमाणपत्र घेऊन ते निवडणुकीवेळी सादर केले होते. या प्रकरणी तेथील माजी नगरसेवक फ्रँकी कार्व्हालो यांनी तक्रार दाखल केली होती.

हेही वाचा 

Back to top button