

पणजी : पुढारी वृत्तसेवा
आदिवासी कल्याण खाते व उटा यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. २५ मे रोजी आंदोलनात हुतात्मा झालेले कै. मंगेश गावकर आणि कै. दिलीप वेळीप यांच्या स्मरणार्थ प्रेरणा दिन कार्यक्रमाचे आयोजन आंबावली केपे येथे करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.
यावेळी आदिवासी कल्याण खात्याचे मंत्री डॉ. रमेश तवडकर, सभापती डॉ. गणेश गावकर, आमदार गोविंद गावडे, आमदार आंतोन वास, गोवा अनु. जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष रवींद्र गावकर, माजी मंत्री आणि 'उटा'चे नेते प्रकाश वेळीप, गोवा राज्य अनुसूचित जाती वित्तीय व विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रीतिदास गावकर, अनु. जमाती महामंडळाचे अध्यक्ष वासुदेव मेंग गावकर, आदिवासी कल्याण खात्याच्या सचिव सुश्री चेष्टा यादव, आदिवासी कल्याण खात्याचे संचालक नीलेश धायगोडकर आदी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी मधू गावडे घोडकिरेकर, रोमाल्डो गोन्साल्विस, शशिकांत गावकर व धाकू मडकईकर यांना आदिवासी प्रज्ञावंत पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. प्रेरणा दिनाच्या निमित्ताने आदिवासी कल्याण खात्यातर्फे व्हिजन डॉक्युमेंट २०३७ प्रकाशन होणार असून ज्या गावात जादा आदिवासी संख्या आहे, तेथे सुविधा केंद्रे, सुधारित अटल आसरा योजना, एफआरए अॅटलस पुस्तकाचे प्रकाशन, आदिवासी खाद्यसंस्कृतीचे पुस्तक, वन हक्क अधिनियम २००६ अन्वये सनदाचे वितरण व अनुसूचित जमातीसाठीच्या आश्रय आधार योजनेला मंजुरी आदेश आदी उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती आदिवासी कल्याण खात्याचे मंत्री रमेश तवडकर यांनी दिल