Goa San Joao Festival | गोव्यातील वैशिष्ट्यपूर्ण सांजाव रंगीबेरंगी जीवनाचा उत्सव

Goa San Joao Festival | पावसाळा सुरू झाला की गोव्याला वेध लागतात सांजांवचे. फेब्रुवारीत होणाऱ्या कार्निव्हलसारखाच हा एक वैशिष्ट्यपूर्ण सण.
Goa San Joao Festival
Goa San Joao Festival
Published on
Updated on

पणजी : पावसाळा सुरू झाला की गोव्याला वेध लागतात सांजांवचे. फेब्रुवारीत होणाऱ्या कार्निव्हलसारखाच हा एक वैशिष्ट्यपूर्ण सण. सांजावचा शुभारंभ उत्तर गोव्यातील शिवोली येथे बुधवारी झाला. या प्रसंगी केंद्रीय पर्यटनमंत्री सुरेश गोपी, आमदार डिलायला लोबो यांच्यासह अनेक जण रंगीबेरंगी कपडे, डोक्यावर फुलांच्या माळा (कपेल) घालून सहभागी झाले होते.

Goa San Joao Festival
Asha Bhosle: दिलखुलास व्यक्तिमत्त्वाचा भावस्पर्शी आठवणींचा प्रवास

या वेळी आकर्षकपणे रंगवलेल्या नौकांतून विहार करण्यात आला. गोवा पर्यटन खात्याच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित केला जातो. पावसाळ्यात पाण्यात भरलेल्या विहिरी, नदीत उडी मारून या दिवशी लोक आनंद साजरा करतात. यावेळी उत्साह आणि जल्लोषाचे वातावरण असते. विविध संगीतवाद्यांच्या तालावर पारंपरिक लोकगीते गाऊन छान वातावरण तयार केले जाते.

Goa San Joao Festival
Gautam Khattar- गौतम खट्टरला मारहाण की आणखी काय?

सांजाव म्हणजे काय?

सांजाव हा अपभ्रंश होऊन आलेला शब्द आहे. मूळ शब्द सेंट जॉन. पोर्तुगीजमध्ये सेंटला सां असे वापरतात. शब्दांचे उच्चारही वेगळे होतात. जॉनचा जुवांव होतो. मूळ सेंट जॉन, त्याचा सां जुवांव आणि नंतर सांजाव.

सांजाव कशासाठी साजरा करतात?

दरवर्षी २४ जूनला सेंट जॉन द बाप्टिस्टचा जन्मदिन साजरा करण्यासाठी सांजाव सण साजरा होतो. आख्यायिकेप्रमाणे वर्जिन मेरी जेव्हा सेंट जॉन यांच्या आईला भेटायला गेली तेव्हा सेंट जॉन यांनी गर्भात आनंदाने उडी मारली. हा सण त्याचे प्रतीकरूप म्हणून साजरा होतो. त्यामुळे लोक विहिरीत उड्या मारतात. ‘सांजांव सांजांव घुंवता मुरे’ (म्हणजे सेंट जॉन (गर्भात) फिरत आहेत) हे पारंपरिक गीतही गायले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news