Goa Carnival 2026: 'गोवा कार्निव्हल'च्या तारखा जाहीर, सुरुवात कुठून, समारोप कुठे? Read Details

Goa Carnival 2026 | 13 फेब्रुवारीला पर्वरीतून सुरुवात, तर म्हापसा, मोरजीत समारोपाची मिरवणूक
Goa Carnival 2026
Goa Carnival 2026
Published on
Updated on

Goa Carnival 2026 Dates and Venue

पणजी : पुढारी वृत्तसेवा

गोवा सरकारचा पर्यटन विभाग गोव्यातील अत्यंत लोकप्रिय आणि प्रतीकात्मक अशा गोवा कार्निव्हल २०२६ साठी सज्ज झाला आहे. आनंद, रंग, संगीत आणि एकतेचा उत्सव असलेला कार्निव्हल स्थानिक नागरिकांबरोबरच पर्यटकांमध्येही मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा उत्सव गोव्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे आणि उत्सवी परंपरेचे प्रतीक आहे.

Goa Carnival 2026
Vasco Pay Parking | वास्को शहरात आजपासून पे पार्किंग

कार्निव्हल मिरवणुकींचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. कार्निव्हल उत्सवाची सुरुवात १३ फेब्रुवारी रोजी पर्वरी येथे पारंपरिक कर्टन रेजर कार्यक्रमाने होणार आहे. मिरवणुकीचा मार्ग आयएचएम ते एसीडीआयएल शाळा असा असेल.

त्यानंतर १४ फेब्रुवारी २०२६ (शनिवार) रोजी पणजी येथे नव्यो पाटो ब्रिजपासून कांपाल मैदानापर्यंत भव्य कार्निव्हल मिरवणूक काढण्यात येईल. १५ फेब्रुवारी रोजी मडगाव येथे उत्सव साजरा होईल. येथे मिरवणूक होली स्पिरिट चर्चपासून मडगाव नगरपालिका चौकापर्यंत निघेल. १६ फेब्रुवारी रोजी वास्को द गामा येथे कार्निव्हल साजरा होणार असून, मिरवणूक सेंट अँड्र्यूज जंक्शन (स्वातंत्र पथ) ते जोशी चौक / रेल्वे स्टेशनपर्यंत जाईल.

Goa Carnival 2026
CM Pramod Sawant | संगीत कॉपीराइटच्या नावाखाली पैसे मागितल्यास थेट तक्रार करा : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

कार्निव्हलचा समारोप १७ फेब्रुवारी २०२६ (मंगळवार) रोजी म्हापसा आणि मोरजी येथे होईल. म्हापसा येथे मिलाग्रिस चर्चमागील कोमुनिदाद इमारतीपासून देव बोडगेश्वर मंदिराजवळील कोमुनिदाद मैदानापर्यंत मिरवणूक निघेल. मोरजी येथे मोरजी खिंड ते राज सुपर मार्केटजवळील मोरजी जंक्शनपर्यंत मिरवणूक होईल.

यावेळी पर्यटन मंत्री रोहन खंवटे म्हणाले, "गोवा कार्निव्हल हा आनंद, समावेशकता आणि सांस्कृतिक अभिमानाचा उत्सव आहे. राज्यभर विविध ठिकाणी हा उत्सव साजरा करून अधिकाधिक लोकांचा सहभाग सुनिश्चित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. कार्निव्हल २०२६ आमच्या जबाबदार आणि रिजनरेटिव्ह पर्यटनाच्या दृष्टीकोनाचे प्रतिबिंब असेल, ज्यात परंपरा जपताना लोक आणि पर्यावरणाचीही काळजी घेतली जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news