Canacona Fish Market| काणकोण पालिका प्रशासकांना काँग्रेसचा घेराव

Canacona Fish Market| मासळी मार्केटमधील अस्वच्छतेवरून विचारला जाब ; चित्रफितीचे सादरीकरण
Goa Fish Market Rates
Goa Fish Market Rates Pudhari File Photo
Published on
Updated on

चावडी : पुढारी वृत्तसेवा

काणकोण नगरपालिका कार्यालयालगत असलेल्या मासळी मार्केटमधील अस्वच्छता, साचलेले सांडपाणी आणि दुर्गंधीच्या समस्येवरून काँग्रेसच्या विविध विभागांच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी (दि. १६) पालिकेचे प्रशासक शंकर गावकर यांना घेराव घालत जाब विचारला.

Goa Fish Market Rates
Pimple Gurav School Issue: पिंपळे गुरवमध्ये शाळेची इमारत ५ वर्षांपासून रखडलेली; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

मासळी विक्रेत्या महिलांनाही आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याचा मुद्दा उपस्थित करत आंदोलनकर्त्यांनी प्रशासकांसमोर मार्केटमधील परिस्थिती दर्शविणारी चित्रफित सादर केली. या वेळी प्रशासक शंकर गावकर यांनी येत्या मंगळवारपर्यंत मासळी मार्केट आणि परिसराची संपूर्ण स्वच्छता करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

या वेळी काँग्रेसचे नेते जनार्दन भंडारी, लोलयेचे माजी सरपंच शैलेश पागी, खोतीगावचे माजी सरपंच दया गावकर, गास्पर कुतिन्हो, सिद्धार्थ गायक, उर्मिला कोस्ता, नेलझीका कार्व्हालो, वैष्णव पेडणेकर, प्रलय भगत, महेश नाईक गावकर, नवदीप फळदेसाई, हर्ष देसाई, शिवम परीत, रूझारियो फर्नांडिस, दयानंद फळदेसाई, इफन कुतिन्हो, केशव गावकर, सिद्धार्थ भंडारी, वैशाल पागी, किरण झोरे आदी उपस्थित होते.

Goa Fish Market Rates
Nashik Medical College Delay-'मंजुरी'ला पाच वर्षे; अद्याप वीटही रचली नाही

सांडपाणी साचून परिसरात दुर्गंधी

पालिकेच्या कार्यालयालगतच असलेल्या मासळी मार्केटमध्ये सांडपाणी साचून परिसरात दुर्गंधी पसरली असून, याबाबत पत्रकारांनीही यापूर्वी पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news