Goa SSC Result - दहावीतही मुलीच अव्वल

दहावीतही मुलीच अव्वल-निकाल ९४.५१ टक्के; १९ हजार ४८६ विद्यार्थी उत्तीर्ण
SSC Result
पर्वरी: पत्रकार परिषदेत बोलताना अध्यक्ष भगीरथ शेट्ये. सोबत विद्यादत्त नाईक, रिमा मडगावकर आणि भारत चोपडे. (छाया : समीर नार्वेकर)
Published on
Updated on

पणजी : गोवा शालांत मंडळातर्फे राज्यातील ३२ परीक्षा केंद्रांवर दहावीची परीक्षा पार पडली असून यंदा ९४.५१ टक्के निकाल लागला आहे. यात मुलांचा निकाल ९४.३७ टक्के तर मुलींचा निकाल ९६.५१ टक्के इतका लागला असून दरवर्षीप्रमाणे मुलीच अव्वल असल्याचे स्पष्ट झाले आहे.

SSC Result
Goa news | मोरजीतील 'ती' आठ बांधकामे पाडण्याचा एनजीटीचा आदेश

पर्वरीत आयोजित पत्रकार परिषदेत अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी सविस्तर माहिती दिली. त्यांच्यासोबत सचिव विद्यादत्त नाईक, सहसचिव रिमा मडगावकर आणि उपसचिव भारत चोपडे उपस्थित होते. परीक्षेला एकूण २०,६५९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यामध्ये १०,८१९ मुले आणि ९,८४० मुलींचा समावेश होता, त्यापैकी १०,०७२ मुले आणि ९४१४ मुली उत्तीर्ण झाल्या.

SSC Result
Goa - चौकशी झाली; मात्र कारवाईत चालढकल

उत्तरपत्रिकेची प्रमाणित छायाप्रत घेण्याचे शुल्क ३५० रुपये प्रति प्रश्नपत्रिका असून त्याची अंतिम मुदत २ मे आहे. तसेच जर विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांचे पुनर्मुल्यांकन करायचे असेल तर ७०० रुपये प्रति प्रश्नपत्रिका शुल्क असून ११ मे यासाठी अंतिम मुदत असेल, असे शेट्ये यांनी नमूद केले. तसेच पुरवणी परीक्षा ६ जून रोजी होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news