BJP Goa Candidate | उमेदवारी देताना निष्ठावंतांना प्राधान्य दिल्यास गोव्यातील अनेक विद्यमान आमदारांचे पत्ते कट होण्याची शक्यता

BJP Goa Candidate | उमेदवार निवडीवेळी भाजप वरिष्ठांचा लागणार कस; राज्य कार्यकारिणीच्या बैठकीनंतर हालचाली गतिमान
BJP Goa Candidate
BJP Goa Candidate
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा
भाजप पक्ष नेहमी निष्ठावंत कार्यकर्त्यांची कदर करत आलेला आहे. या पक्षात सामान्य कार्यकर्त्यालाही उच्च स्थान देण्यात येते, असा दावा पक्षातील नेते, पदाधिकारी व अनेकांकडून करण्यात येत असतो.

BJP Goa Candidate
Foreign Woman Rape Case | परदेशी महिलेवरील बलात्कारप्रकरणी बंगळुरुस्थित खासगी कंपनीच्या सीईओला पणजी महिला पोलिसांकडून अटक

नुकत्याच भाजपच्या मुख्यालयात राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या उपस्थितीत झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत बऱ्याच महत्त्वाच्या ठरणार असे सूतोवाच अनेक नेत्यांनी केले. प्रदेशध्यक्ष दामू नायक यांनी तर पक्षाचे कमल चिन्ह भाजपचा उमेदवार असेल, असे सूचक विधान केले आहे.

पक्षाशी प्रामाणिक राहणाऱ्यानालाच उमेदवारी देण्यात येईल, असा त्यांच्या विधानाचा अर्थ कार्यकर्ते काढत आहेत. खरोखरच आपने निष्ठावंतांनाच उमेदवारी देण्याचे ठरवले तर काही आमदारांची उमेदवारी कापली जाऊ शकते. काँग्रेसमधून भाजपात आलेला काही आमदारांचाही त्यात समावेश होऊ शकतो. यापूर्वीही वेगवेगळ्या पद्धतीने प्रदेशध्यक्ष हेच बोलले होते.

मांद्रे मतदारसंघात माजी मुख्यमंत्री व माजी भाजप प्रदेशाध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर हे भाजपचे निष्ठावंत आहेत, त्यांनी गोव्यात भाजपच्या विस्तारासाठी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर आदी नेत्यांसोबत बरेच परिश्रम घेतले आहेत.

मात्र, २०२२ च्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी डावलल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी भरली आणि भाजपचे उमेदवार दयानंद सोपटे पराभूत झाले. आता ते पुन्हा भाजपमध्ये येणार असल्याचे चर्चा आहे. मांद्रेत दयानंद सोपटे हेही भाजपचे निष्ठावंत आहेत. त्यामुळे कुणाला उमेदवारी मिळणार ते पाहावे लागेल. मगो सोबत आपने युती कायम ठेवली, तर हा मतदारसंघ मगोच्या वाटेला जाण्याची शक्यता आहे. कारण येथे मगोचा आमदार आहे. तसे झाल्यास निष्ठावंत पार्सेकर किंवा सोपटे यांचे काय हा प्रश्न आहे.

पणजी मतदारसंघात २०२२ मध्ये उमेदवारी न मिळाल्याने नाराज होऊन अपक्ष निवडणूक लढवलेले माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर हेही भाजपचे निष्ठावंत असून तेही भाजपमध्ये फेरप्रवेशाच्या तयारीत आहेत. मात्र, त्यांना पणजीच्या उमेदवारीची हमी आहे. मगो नेते व वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी विज मंत्री निष्ठावंतांना उमेदवारी द्यावी बाहेरील आलेल्यांना उमेदवारी देऊ नये, असे म्हटले होते.

निष्ठावंतांची व्याख्या ठरवावी लागेल

मायकल लोबो, दिलायला लोबो यांनी भाजपमधून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली होती. २०२२ च्या निवडणुकीत आपने दिलायला लोबो यांना उमेदवारी देण्यास नकार दिल्याने मायकल लोबो यांनी काँग्रेसची उमेदवारी स्वतःसाठी व दिलायलासाठी मिळवली व दोन्ही जागा निवडून आले. त्यानंतर लगेच भाजपमध्ये गेले. त्यामुळे त्यांना निष्ठावंत म्हणणार की बाहेरील, असा प्रश्न आहे.

BJP Goa Candidate
URPro Card Goa Digital | यूआरप्रो कार्डसाठी केवळ 5 टक्के जमीनमालकांकडून कागदपत्रे सादर; पणजी, मडगावमधील सर्वेक्षणाचे वृत्त

साळगावचे आमदार केदार नाईक यांच्या बाबतीतही असाच प्रकार आहे, तेही भाजपचेच. मात्र २०२२ मध्ये त्यांना उमेदवारी डावलल्यामुळे त्यांनी काँग्रेसची उमेदवारी मिळवली आणि जिंकून आले व लोबोंसह भाजपात आले. त्यांना पक्ष निष्ठावंत म्हणणार की बाहेरचे, असा प्रश्न तयार झाले असल्याने निष्ठावंत याचा नेमका अर्थ भाजपच्या नेत्यांनी स्पष्ट करणे गरजेचे ठरते.

कुंभारजुवेत केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे सुपुत्र जिल्हा पंचायत सदस्य सिद्धेश नाईक यांना उमेदवारी द्यावी, असेही त्यांनी सुचवले होते. सिद्धेश नाईक यांनी दोन दिवसांपूर्वी खोर्ली येथे घेतलेल्या महिला मेळाव्यात महिलांची मोठी उपस्थिती पाहता त्यांच्या मागे मोठ्या प्रमाणात मतदार असल्याचे दिसून आले. निष्ठावंतांचा विचार करावयाचा झाल्यास अनेक मतदारसंघात भाजपला उमेदवार बदलावे लागतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news