13 Bills in Goa Assembly Session |विधानसभा अधिवेशनात तेरा विधेयके होणार सादर

बीएसीच्या बैठकीत निर्णय : '39 ए' वर होणार चर्चा
पर्वरी येथे आयोजित विधानसभा कामकाज सल्लागार मंडळाच्या बैठकीत सभापती डॉ. गणेश गावकर, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उपसभापती जोशुआ डिसोझा, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव व इतर.
पर्वरी येथे आयोजित विधानसभा कामकाज सल्लागार मंडळाच्या बैठकीत सभापती डॉ. गणेश गावकर, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उपसभापती जोशुआ डिसोझा, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव व इतर.
Published on
Updated on

पणजी : गोवा विधानसभेच्या येत्या अधिवेशनात १३ विविध विधेयके सादर होऊन संमत होणार आहेत. त्याच सोबत 39 ए सह इतर महत्त्वाच्या विषयावर चर्चा होणार आहे. पर्वरीत येथे शुक्रवारी विधानसभा कामकाज सल्लागार समितीची (बीएसी) बैठक झाली. बैठकीमध्ये सभापती डॉ. गणेश गावकर, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपसभापती जोशुआ डिसोझा, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, मंत्री सुदिन ढवळीकर, इतर मंत्री आमदार विजय सरदेसाई व समितीचे सदस्य उपस्थित होते.

बैठकीनंतर बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, आगामी गोवा विधानसभा अधिवेशनात पुरवणी विनियोग विधेयकांसह सुमारे तेरा विधेयके सादर केली जातील. तसेच नेहमीचे प्रश्न आणि इतर बाबी अध्यक्षांच्या निर्णयानुसार हाताळल्या जातील. दरम्यान, ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबर असे तीन दिवस होणाऱ्या या पावसाळी अधिवेशनामध्ये ३९ ए कलमासोबतच

राज्यातील रस्त्यावरील खड्डे आणि बेरोजगारी यावर चर्चा व्हावी, अशी जी विरोधकांनी मागणी केली होती ती मागणी सभापती डॉ. गणेश गावकर यांनी मान्य केली आहे, अशी माहिती आमदार विजय सरदेसाई यांनी दिली.

आम्ही तीन ते चार महत्त्वाच्या मागण्या केलेल्या आहेत आणि त्यावर चर्चा करण्यासाठी आम्हाला पुरेसा वेळ देण्याची मागणी केली आहे. रस्त्यावरील खड्डे, बेरोजगारी, नियोजन न करता सुरू असलेली विकासकामे व 39 ए यावर चर्चा करण्याची मागणी केली असून, सभापतींनी ती मागणी मान्य केल्याचे सरदेसाई यांनी स्पष्ट केले. विरोधकांनी ज्या मागण्या ठेवल्या आहेत त्यावर चर्चा करण्यासाठी विरोधकांना पुरेसा वेळ द्यावा लागेल, असे वेन्झी विएगस यांनी सांगितले. आमदार वीरेश बोरकर यांनी तीन दिवसांचे अधिवेशन अपुरे पडणार असल्याचे सांगत जी वेळ दिली जाते ती पूर्णपणे दिली जावी, अशी सूचना केली.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले की, भाजप बहुमतात असल्याने सरकार मनमानी करत आहे. विरोधकांना विधानसभेत बोलण्याची पुरेसी संधी देत नाही, हा प्रकार लोकशाहीला मारक आहे, तीन दिवसांत विरोधकांनी किती संधी दिली जाते ते विधानसभा अधिवेशन काळातच कळेल. तीन दिवसांचे अधिवेशन अपुरे आहे. असे आलेमाव यांनी नमूद केले.

पर्वरी येथे आयोजित विधानसभा कामकाज सल्लागार मंडळाच्या बैठकीत सभापती डॉ. गणेश गावकर, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उपसभापती जोशुआ डिसोझा, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव व इतर.
Pramod Sawant praises Subhash Phal Dessai | मंत्री सुभाष फळदेसाईंकडून 'समाजकल्याण'ला न्याय

पुरवणी बजेट सादर होणार

सभापती डॉ. गणेश गावकर यांनी सांगितले की, येत्या अधिवेशनामध्ये पुरवणी (सप्लीमेंट्री) बजेट मांडून ते संमत होणार आहे. त्याचबरोबर काही प्रश्नोत्तरे असतील. तसेच लक्षवेधी सूचना येतील. विरोधकांना त्यांनी दिलेल्या विषयावर बोलण्याची संधी मिळेल. मात्र, त्यांनी वेळेच बंधन पाळावे लागेल, असे गावकर स्पष्ट केले

पर्वरी येथे आयोजित विधानसभा कामकाज सल्लागार मंडळाच्या बैठकीत सभापती डॉ. गणेश गावकर, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उपसभापती जोशुआ डिसोझा, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव व इतर.
Kingfish shortage in Goa|चमचमत्या 'किंगफिश'ची मच्छीमार, खवय्यांना प्रतीक्षा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news