Goa Assembly Election 2027 | भाजपसह सर्वच पक्ष रणनीती आखण्यात व्यस्त

Goa Assembly Election 2027 | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग
Goa Assembly Election 2027
Goa Assembly Election 2027(Pudhari File Photo)
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

गोवा विधानसभेच्या निवडणुका फेब्रुवारी २०२७ मध्ये होण्याची शक्यता असून, त्यासाठी अवघे सात महिने शिल्लक राहिल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. एकीकडे भारतीय जनता पक्षाचे संघटन सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी गेल्या दोन दिवसांत बैठकांचा धडाका लावत निवडणुकीची तयारी सुरू केली आहे, तर दुसरीकडे विरोधी पक्षही रणनीती आखण्यात व्यग्र आहेत.

Goa Assembly Election 2027
Goa Politics-संकेत आर्सेकरांच्या एण्ट्रीने बदलणार समीकरणे

बी. एल. संतोष यांनी भाजपच्या न विविध विभागांच्या सलग बैठका घेत संघटनात्मक तयारीचा आढावा घेतला. मात्र, या बैठकांविषयी माध्यमांसमोर कोणतीही अधिकृत . माहिती देण्यात आलेली नसल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चाना न उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षही सावध झाले असून, सर्व विरोधकांना एकत्र आणण्याच्या दृष्टीने काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी चाचपणी सुरू केली आहे.

गिरीश चोडणकर यांनी सासष्टीत मतांची विभागणी करण्यासाठी भाजपकडून १०० कोटी रुपये खर्च करून नवा पक्ष उभा करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला आहे. या आरोपामुळे भाजप नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत चोडणकर यांच्यावर टीका सुरू केली आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी या आरोपात कोणतेही तथ्य नसल्याचे म्हटले आहे. निवडणुका जसजशा जवळ येतील, तसतसे आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होतील. दरम्यान, बी. एल. संतोष यांच्या गोवा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील कमी सक्रिय आमदारांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते, अशीही चर्चा सुरू आहे.

रविवारी त्यांनी भाजपचे आमदार आणि मंत्र्यांसोबत बैठक घेऊन त्यांच्या मतांचा आढावा घेतला. काही आमदार आणि मंत्र्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा कर्मचारी भरती आयोग स्थापन करून सरकारी नोकऱ्यांची भरती प्रक्रिया सुरू केल्यामुळे नागरिक नोकरीसाठी आमदार-मंत्र्यांकडे येत नसल्याची तक्रार संतोष यांच्याकडे केल्याचे समजते.

मात्र, याबाबत संतोष यांनी कोणतेही आश्वासन दिले नसल्याची माहिती आहे. सोमवारीही बी. एल. संतोष यांनी दिवसभर भाजपच्या विविध बैठका घेतल्या. राज्य समिती, गाभा-बाबा समिती, राज्य पदाधिकारी, विविध मोर्चाचे व मंडळांचे अध्यक्ष तसेच सक्रिय कार्यकर्त्यांशी संवाद साधून आगामी सहा महिन्यांत विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक संघटनात्मक तयारी आणि नियोजनाबाबत मार्गदर्शन केल्याचे समजते.

Goa Assembly Election 2027
Opposition to AI cameras | एआय कॅमेऱ्यांनाही विरोध

गोवा फॉरवर्डची दहा जागांवर तयारी

आमदार विजय सरदेसाई यांनी काँग्रेसविरोधात कधीही टोकाची भूमिका घेतली नसल्याचे सांगत गिरीश चोडणकर यांनी त्यांच्याशी राजकीय जवळीक वाढविण्याचा प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे.

सरदेसाई यांनी राज्यातील दहा मतदारसंघांमध्ये जोरदार तयारी सुरू केली असून, त्यांनी आपली स्वतंत्र भूमिका कायम ठेवली तर काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड यांच्यातील संभाव्य युतीची समीकरणे बदलू शकतात. विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येतील, तसतशा राज्यातील राजकीय घडामोडींना अधिक वेग येण्याची आणि आरोप-प्रत्यारोपांची तीव्रता वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news