Goa Archives E-library | इतिहासप्रेमी अन् संशोधकांसाठी खजिना खुला! गोव्यात ई-लायब्ररीमुळे 35,800 पुस्तके झाली ऑनलाईन.

Goa Archives E-library | घरी बसून वाचता येणार गोव्याचा इतिहास! अभिलेखागार विभागाचा डिजिटायझेशनचा मोठा उपक्रम.
Library
LibraryPudhari
Published on
Updated on
Summary
  • संग्रह सर्वांसाठी उपलब्ध करून देणे हा खात्याचा उद्देश

  • वाचकांच्या गरजा ओळखून डिजिटायझेशन मोहीम

पणजी : पुढारी वृत्तसेवा
अभिलेखागार विभागाची सुमारे ३५ हजार ८०० पुस्तके आणि इतर संसाधने आता त्याच्या ई-लायब्ररीद्वारे ऑनलाईन शोधता येतात, ज्यामुळे विद्यार्थी, संशोधक, इतिहासकार आणि सर्वसामान्य जनता इंटरनेट सुविधा असलेल्या कोणत्याही ठिकाणाहून हा संग्रह पाहू शकतात.
खात्याचे अधिकारी डॉ. बालाजी शेणॉय म्हणाले की, तरुणांना अधिक पुस्तके वाचण्यास प्रोत्साहित करणे आणि संग्रह सर्वांसाठी उपलब्ध करून देणे हा खात्याचा उद्देश आहे.

Library
Sadanand Tanavade | गोवा ते सोलापूर थेट रेल्वे सेवा सुरू करा! खासदार सदानंद शेट तानावडे यांची दिल्लीत मागणी

विभागाच्या डिजिटायझेशन मोहिमेअंतर्गत संपूर्ण ग्रंथालय संग्रह टप्प्याटप्प्याने समाविष्ट करण्याची योजना आहे. विभागाच्या डिजिटायझेशन मोहिमेअंतर्गत टप्प्याटप्प्याने संपूर्ण ग्रंथालय संग्रह समाविष्ट करण्याची योजना आहे. गरजा समजून घेण्यासाठी विभाग डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करत आहे, अशी माहिती शेणॉय यांनी दिली.


अभिलेखागार विभागाच्या ग्रंथपाल संध्या भांडणकर यांनी सांगितले की, महिन्यातून सुमारे १०० ते १५० विद्यार्थी/अभ्यासक ग्रंथालयाला भेट देतात. ऑनलाईन कॅटलॉग सुरू केल्यानंतर, आम्ही आधीच १९९ ऑनलाईन दर्शकांची नोंद केली आहे. आम्हाला अपेक्षा आहे की यात आणखी वाढ होईल, कारण आता जगभरातील लोकांना आमच्याकडे काय आहे हे पाहता येईल आणि ते त्यांच्या संशोधन भेटींचे नियोजन करू शकतील, अशी माहिती भांडणकर यांनी दिली.

Library
Goa High Court | मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचा मोठा निर्णय; 14 वर्षीय पीडित मुलगी बाळासह कुटुंबाच्या स्वाधीन!

चांगले पुस्तक भांडार

ऑनलाईन कॅटलॉग अभिलेखागार विभागाच्या अधिकृत वेबसाइटद्वारे पाहता येईल. असे सांगून ग्रंथालयाच्या संग्रहात गोव्याच्या इतिहासाच्या आणि वारशाच्या प्रमुख क्षेत्रांचा समावेश असलेली पुस्तके आहेत. नेरी झेवियर, पांडुरंगा पिसुर्लेकर, मनोहर सरदेसाई, लोपेस मेंडीस आदी ज्येष्ठ लेखकांनी गोवा दमणा आणि दीव स्वतंत्र लढ्यावर लिहिलेली पुस्तके उपलब्ध असल्याचे भांडणकर यांनी सांगितले.

पोर्तुगीजकालीन ऐतिहासिक साहित्याचा समावेश

ग्रंथालयात पोर्तुगीज काळातील ऐतिहासिक साहित्यही आहे, ज्यात् १७ व्या आणि १८ व्या शतकातील पुस्तके आणि दस्तऐवजांचा समावेश आहे. खात्याने नोंदवलेले सर्वात जुने पुस्तक 'हिस्टोरी डेर इन्क्विझिटिए टॉट गोवा' हे असून ते १६९७ मध्ये प्रकाशित झाले होते, अशी माहिती त्यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news