Goa Opposition Alliance: विजय सरदेसाई अन् युरी आलेमाव यांच्यातील गैरसमज दूर होणार; काँग्रेसची मध्यस्थी

Goa Opposition Alliance: "आप च्या घुसखोरीचे पुरावे आमच्याकडे आहेत"; काँग्रेस नेते गिरीश चोडणकरांचा मोठा दावा!
Vijay Sardesai
Vijay SardesaiPudhari Photo
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्यात केवळ संवादाचा अभाव होता. दोघांशीही चर्चा झाली असून भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होणार नाही, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला.

Vijay Sardesai
Inland Water Sports Ban | अंतर्गत जलक्रीडांना हायकोर्टाच्या गोवा खंडपीठाकडून ब्रेक; तत्काळ स्थगिती देण्याचे आदेश

चोडणकर म्हणाले, युरी आलेमाव यांनी सरदेसाई यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सरदेसाई यांनी तो कॉल किंवा संदेश आपण कमी वापरत असलेल्या दुसऱ्या मोबाईल क्रमांकावर आला असावा, असे सांगितले.

त्यामुळे गैरसमज निर्माण झाला. आम्हाला विरोधी आघाडीचे वातावरण सकारात्मक ठेवायचे असून औपचारिक चर्चा सुरू झाल्यानंतर अशा घटना टाळल्या जातील, असे ते म्हणाले. युरी आणि विजय हे दोघेही गोवेकरांच्या प्रश्नांसाठी लढणारे सक्षम आमदार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

'आप'च्या घुसखोरीचे पुरावे असल्याचा दावा

'आप'चे केंद्रीय नेते अल्पसंख्याक मतदारसंघांमध्ये जाऊन धर्मगुरूंशी संपर्क साधत असून प्रलोभने दिली जात असल्याच्या तक्रारी आमच्या आमदारांनी केल्या आहेत. यासंदर्भातील व्हिडिओ आणि अन्य पुरावे आमच्याकडे आहेत. मात्र, गोव्यातील विरोधक एकत्र यावेत, ही जनतेची अपेक्षा लक्षात घेऊन आम्ही संयम बाळगत आहोत, असा दावा गिरीश चोडणकर यांनी केला.

Vijay Sardesai
Goa Opposition Rift Vijay Sardesai | विरोधात पुन्हा विसंवाद! विजय सरदेसाईंना निमंत्रणच नाही, गोवा फॉरवर्ड अध्यक्षांची तीव्र नाराजी

चर्चेनंतर भूमिका जाहीर करणार...

काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्याने युतीबाबत चर्चा करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत विरोधी पक्षांमध्ये औपचारिक चर्चेला सुरुवात होईल. जागावाटपासह सर्व मुद्द्यांवर प्रथम परस्पर चर्चा केली जाईल आणि त्यानंतरच भूमिका जाहीर करण्यात येईल, असे चोडणकर यांनी स्पष्ट केले.

इतर तपशील:

चोडणकर म्हणाले की, पक्षाचे 'आप'चे वाल्मिकी नाईक यांच्याशी तीन वेळा चर्चा केली आहे. 'आप'चे केंद्रीय नेते काँग्रेसच्या अल्पसंख्याक मतदारसंघांमध्ये सक्रिय होत असल्याबाबत नाराजी व्यक्त करून स्पष्ट भूमिका घ्यावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news