Girish Chodankar | गोव्यात 2,147 कोटींचा एफएआर घोटाळा? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचा सरकारवर गंभीर आरोप

Girish Chodankar | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचा आरोप : स्वतंत्र चौकशीची मागणी
Girish Chodankar Goa
Girish Chodankar Goa
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा
नगर नियोजन खात्याने (टीसीपी) व्यावसायिक आस्थापनांना योग्य शुल्क आकारणी न करता अतिरिक्त एफएआर मंजूर केल्याने सरकारला २,१४७ कोटी रुपयांचा महसुली तोटा झाल्याचा दावा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला. या प्रकरणाची तातडीने स्वतंत्र आणि कालमर्यादित चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

Girish Chodankar Goa
Panaji Voter List | पणजी मतदारसंघातील मतदार यादीत फेरफार

पणजी येथे बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत चोडणकर बोलत होते. यावेळी माध्यम प्रमुख अमरनाथ पणजीकर व इतर नेते उपस्थित होते. ते म्हणाले, व्यावसायिक आस्थापनांना योग्य शुल्क न आकारता अतिरिक्त फ्लोअर एरिया रेशो (एफएआर) मंजूर करण्यासंदर्भात गोव्याच्या महालेखापाल (लेखापरीक्षण) यांनी केलेल्या गंभीर निरीक्षणाचा दाखला देत चोडणकर यांनी या प्रकरणी २,१४७ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा दावा केला.

९ जून २०२५ रोजीच्या लेखापरीक्षण निरीक्षणानुसार, नगर व ग्राम नियोजन विभागाने ३२१ व्यावसायिक आस्थापनांना विहित शुल्क यंत्रणेशिवाय १.५४ टक्के ते २४० टक्के अतिरिक्त एफएआर मंजूर केला आहे. त्याअंतर्गत १०,७३,५५९.५३ चौरस मीटर अतिरिक्त एफएआर मंजूर करण्यात आला आहे.

Girish Chodankar Goa
ST Political Reservation | "एसटी राजकीय आरक्षणासाठी 13 ऑगस्टला 'चलो पणजी'! 'उटा' संघटनेचा सरकारला थेट इशारा"

व्यावसायिक आस्थापनांना मौल्यवान विकास हक्क प्रदान करण्यात आले असून, त्यासाठी योग्य शुल्क आकारण्यात आले नसल्यास ही गंभीर सार्वजनिक चिंतेची बाब आहे. काँग्रेस या प्रकरणाचा योग्य अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणार असून, सरकारी तिजोरीचे नुकसान झाले असल्यास त्याची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेस सत्तेवर आल्यास जनतेच्या सहभागातून पारदर्शक आणि लोककेंद्रित प्रादेशिक आराखडा २०२८ तयार केला जाईल, असे चोडणकर यांनी जाहीर केले.

आरजीपी, आपसोबत दोन दिवसांत चर्चा...

गोवा फॉरवर्डसोबतच्या युतीबाबत काँग्रेसचे धोरण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, आरजीपी आणि आपसोबत येत्या दोन दिवसांत चर्चा केली जाणार असल्याची माहिती चोडणकर यांनी दिली. भाजप आणि सरकार निवडणुकीला घाबरत असल्याने पालिका निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, न्यायालयाने त्या जानेवारीत घेण्याचे आदेश दिले आहेत, असा दावा चोडणकर यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news