

डिचोली : डिचोली तालुक्यातील मेणकुरे येथे अंगावर होळी पडून जखमी झालेले पोलिस हवालदार प्रणव मिशाळ (४२ वर्षे, मेणकुरे, डिचोली) यांचे गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात निधन झाले.
करत असताना झाड अंगावर पडून गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर बांबोळी येथील गोमेकॉत उपचार सुरू होते. मंगळवारी सकाळी त्यांचे निधन झाले.
प्रणव गोवा पोलिसांच्या सुरक्षा विभागात होते व सरकारी अभियोक्त्यांच्या हाताखाली सेवा बजावत होते. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, आई, वडील व भाऊ असा परिवार आहे. ते एक चांगले नाट्यकलाकार होते.