Minister Ramesh Tawadkar | अधिक सक्षम सुविधा देणे हेच विकासाचे उद्दिष्ट!; मंत्री डॉ. रमेश तवडकर

Minister Ramesh Tawadkar | तळपण येथे श्री गणेश विसर्जन मंडपाचे उद्घाटन; भाविकांना मिळणार सुविधा
Goa News Ramesh Tawadkar
Goa News Ramesh Tawadkar Pudhari photo
Published on
Updated on

पैंगीण : पुढारी वृत्तसेवा
गणेशोत्सवासारख्या समृद्ध धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांचे जतन करताना भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी आहे. परंपरा जपत लोकांच्या गरजा पूर्ण करणारा विकास हाच खऱ्या अर्थाने मानवकेंद्रित विकास आहे, असे प्रतिपादन काणकोणचे आमदार तथा क्रीडा व युवा व्यवहार, कला व संस्कृती आणि आदिवासी कल्याण मंत्री डॉ. रमेश तवडकर यांनी केले.

Goa News Ramesh Tawadkar
Goa Pollution News | काणकोणातील मळीचे त्वरित स्थलांतर करा

तळपण, काणकोण येथे श्री गणपती विसर्जन मंडपाचे उद्घाटन डॉ. रमेश तवडकर यांच्या हस्ते करण्यात आले. गणेश चतुर्थीच्या काळात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन सुरक्षित, सुव्यवस्थित आणि श्रद्धापूर्वक करता यावे, तसेच भाविकांची गैरसोय टाळता यावी, या उद्देशाने या मंडपाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
गणेशोत्सव हा गोमंतकीयांच्या श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक एकोप्याशी जोडलेला उत्सव आहे. या पार्श्वभूमीवर विसर्जनासाठी योग्य सुविधा उपलब्ध झाल्याने स्थानिक भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Goa News Ramesh Tawadkar
Shramdham Housing Scheme | डिसेंबरपर्यंत श्रमधामचे 100 वे घर करणार पूर्ण

धार्मिक परंपरांना आवश्यक पायाभूत सुविधा देतानाच स्वच्छता, शिस्त आणि सुरक्षिततेलाही प्राधान्य दिले पाहिजे, अशी भूमिका व्यक्त करण्यात आली. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य अजित (अजय) लोलयेकर, पैंगीण ग्रामपंचायतीच्या सरपंच सविता तवडकर, रवींद्र भवन काणकोणचे उपाध्यक्ष रमाकांत नाईक गावकर, उपसरपंच सुनील पैंगीणकर, पंच सदस्य अस्मिता जोशी,

सतीश पैंगीणकर व महेश नाईक, अखिल गोवा क्षत्रिय पागी समाजाचे अध्यक्ष तथा माजी पंच सदस्य रुद्रेश नमशीकर, क्रीडा प्राधिकरण गोवाचे खजिनदार विनय तुबकी, अनिल केळुसकर, प्रकाश मेत्री यांच्यासह इतर मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवीन मंडपामुळे गणपती विसर्जनाच्यावेळी भाविकांना अधिक चांगली व सुरक्षित सुविधा मिळणार असून, स्थानिकांच्या मागणीला प्रतिसाद देत उभारण्यात आलेली ही सुविधा गावाच्या सार्वजनिक सोयींमध्ये महत्त्वाची भर ठरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news