Goa News | सांकवाळ येथे पाण्यात मिसळले इंधन

पाण्याला आग लागत असल्याने ग्रामस्थांत भीती; स्रोत शोधण्याचे काम सुरू
goa
अवर लेडी ऑफ हेल्थ चर्चच्या सांकवाळ इंधनमिश्रित पाण्याला लागलेली आग पाहत असताना आमदार आंतोनियो वास व इतर.pudhari photo
Published on
Updated on

वास्को : सिंदोळी-सांकवाळ येथील अवर लेडी ऑफ हेल्थ चर्चच्या परिसरातील विहिरीतील पाण्याला इंधनाचा वास येऊ लागल्याने तसेच इंधनमिश्रित पाणी पेट घेऊ लागल्याने स्थानिकांनी चिंता व्यक्त केली आहे. सांकवाळच्या इतर विहिरी व नाल्यांमध्ये इंधन मिसळण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी दखल घेताना कुठ्ठाळीचे आमदार आंतोनियो वास यांनी संबंधित सर्व सरकारी यंत्रणेला माहिती दिली. त्यानंतर त्या इंधनाचा स्रोत शोधण्याचे काम हाती घेण्यात आले.

goa
Goa | गोव्यात प्रलंबित खटल्यांचा डोंगर, दीड वर्षांत सुमारे ३ हजारांची वाढ; न्यायाधीशांची कमतरता
Admin

परिसरामध्ये असलेल्या विहिरीतील पाण्याचा वापर पिण्यासाठी तसेच इतर दैनंदिन कामासाठी करण्यात येतो. या विहिरीच्या पाण्याला एक प्रकारचे वास येत असल्याचे जानेवारी महिन्यात उघडकीस आले होते. विहिरीची साफसफाई करण्यात न आल्याने सदर वास येत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे विहिरीतील पाण्याचा उपसा करण्याचे ठरविले होते. तत्पूर्वी संबंधित खात्याला तक्रार करण्याचा निर्णय घेण्यात आला. तीन महिने उलटून गेल्यावरही त्यासंबंधी कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे त्या विहिरीतील पाण्यात इंधनाची मात्रा वाढू लागली. या इंधनाची मात्रा अधिकच वाढल्याने तेथे वास पसरल्याने तसेच पाण्याला इंधनाचा उग्र वास येऊ लागल्याने याप्रकरणी चर्च समिताला व इतरांना माहिती देण्यात आली.

सदर विहिरीचे पाणी आम्ही पिण्यासाठी तसेच दैनंदिन कामासाठी वापरतो. विहिरीतील पाणी झाडांना देण्यात येते. त्यामुळे काही दिवसांपासून झाडांवर त्याचा परिणाम दिसत होते. फळे, पाने गळून पडल्याचे दिसून आले असल्याचे चर्चच्या फादरने सांगितले. विहिरीतील पाण्याला वास येत असल्याने आम्ही पाणी पुरवठा विभागाकडून नळ कनेक्शन घेतले आहे. विहिरीतील पाण्यात इंधन कोठून येत आहे, ते स्पष्ट होत नसल्याचे त्यांनी सांगितले.

goa
Goa | गोव्यात प्रलंबित खटल्यांचा डोंगर, दीड वर्षांत सुमारे ३ हजारांची वाढ; न्यायाधीशांची कमतरता

आमदार वास यांनीही सदर घटनेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. याप्रकरणी आपण सर्व संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना माहिती देऊन तपासणी करण्याची सूचना केल्या. त्याप्रमाणे प्रत्येक खाते येऊन पाहणी करून, पाण्याचे नमुने गोळा करीत आहेत. जलस्त्रोत खात्याच्या अधिकारयांनी तेथील इतर विहिरी, वापरतो. विहिरीतील पाणी झाडांना देण्यात येते. त्यामुळे काही दिवसांपासून झाडांवर त्याचा परिणाम दिसत होते. फळे, पाने गळून पडल्याचे दिसून आले असल्याचे चर्चच्या फादरने सांगितले. विहिरीतील पाण्याला वास येत असल्याने आम्ही पाणी पुरवठा विभागाकडून नळ कनेक्शन घेतले आहे. विहिरीतील पाण्यात इंधन कोठून येत आहे, ते स्पष्ट होत नसल्याचे त्यांनी सांगितले.

तळ्यांतील पाण्याची चाचणी करण्यास आरंभ केला आहे. या विहिरीत इंधन कोठून मिसळले आहे, त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. विहिरीतील इंधनमिश्रित पाणी पेट घेत असल्याने तेथे खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

goa
Goa | शापोरा, साळ नद्यांना राष्ट्रीय जलमार्गाचा दर्जा

चर्च समितीचे एक सदस्य व सामाजिक कार्यकर्ते पीटर डिसोझा यांनीही त्या इंधनाचा स्रोत लवकर शोधण्याची गरज व्यक्त केली आहे. या गावातील रहिवाशी अधिकाअधिक आपल्या परिसरातील विहिरींवर अवलंबून आहेत. त्यामुळे इतर विहिरींचीही तपासणी करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. वरच्या भागात असलेल्या महामार्गाच्या कामासंबंधी खोदकाम सुरू आहे.

खोदकाम करताना खबरदारी घेण्याची गरज आहे. तेथे खोदकाम करताना एखाद्या इंधनवाहिनीला नुकसान झाल्याची शक्यताही नाकारता येत नाही. यापूर्वी योग्य उपासनगर सांकवाल येथे जेसीबीद्वारा खोदकाम करताना जलवाहिनी फोडण्यात आली होती. तथापी त्याची दुरुस्ती झाली नाही. याची आठवण त्यांनी करून दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news