Child Torture Case | बाणावली येथे चार वर्षांच्या बालिकेला पेटत्या मणबत्तीने चटके देणारा नराधम पोलिसांच्या जाळ्यात

Child Torture Case | बाणावलीतील संतापजनक प्रकार; संशयिताला अटक
Child Abuse Case
Child Abuse CasePudhari
Published on: 
Updated on: 

मडगाव : पुढारी वृत्तसेवा
बाणावली येथे चार वर्षांच्या बालिकेला पेटत्या मणबत्तीने चटके देऊन तिचा छळ केल्याच्या आरोपाखाली कोलवा पोलिसांनी हजरत अली मेहबूबसाब कलकेरी (वय २७, मूळ कारवार-कर्नाटक, सध्या बाणावली) याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

Child Abuse Case
Goa Margao Street Vendor Issue | मडगाव येथील फेरीवाल्यांचा प्रश्न चिघळला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालिकेची आई नौकरीनिमित्त कुवेतला गेल्याने तिने आपल्या चार आणि आठ वर्षांच्या मुलींना दवर्ली येथील नातेवाईकांकडे ठेवले होते. १० ऑक्टोबर रोजी संशयिताच्या सांगण्यावरून दोन्ही मुलींना बाणावली येथील त्याच्या घरी नेण्यात आले.

१ नोव्हेंबर रोजी मुलींना परत आणल्यानंतर चार वर्षांच्या बालिकेच्या अंगावर भाजल्याच्या गंभीर जखमा दिसून आल्या. मोठ्या बहिणीकडे चौकशी केली असता, जेवताना लहान बहिणीकडून शौच झाल्याने घर अस्वच्छ झाल्याच्या रागातून संशयिताने दोन्हीना मारहाण केल्याचे समोर आले. तसेच लहान बालिकेच्या गुप्तांगासह शरीराच्या अन्य भागांवर पेटत्या मणबत्तीने चटके दिल्याचा आरोप आहे.

Child Abuse Case
Madgaon Fish Market | मडगाव येथील एसजीपीडीएच्या घाऊक व किरकोळ मासळी मार्केटच्या पाहणीत उघड झाल्या अनेक गंभीर त्रुटी

वास्को येथील 'सवेरा ट्रस्ट'च्या अध्यक्षा तारा केरकर यांनी या घटनेची माहिती मिळताच कोलवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमासह पोक्सो कायद्याचे कलम ८ आणि गोवा बाल कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला.

संशयिताला न्यायालयात हजर केले असता, पुढील तपाससाठी चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावन्यात आली. महिला पोलिस उपनिरीक्षक हर्पदा नाईक-देसाई तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.