Panjim Municipality | पणजी महापालिकेचे पहिले महापौर अशोक नाईक यांचा रविवारी गौरव

Panjim Municipality | हा सोहळा सायंकाळी ४.३० वाजता पणजी येथील मिनेझिस ब्रागांझा संस्थेच्या सभागृहात होणार आहे.
Panaji Municipal Corporation Reservation
Panaji Municipal Corporation Reservation
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

पणजी महापालिकेचे पहिले महापौर अशोक मोगू नाईक यांनी वयाची ८० वर्षे पूर्ण केल्याबद्दल तसेच कार्यकाळात त्यांच्या भ्रष्टाचारमुक्त कारभार केल्याबद्दल त्यांच्या चाहत्यांतर्फे रविवारी, दि. ३१ मे रोजी गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा सायंकाळी ४.३० वाजता पणजी येथील मिनेझिस ब्रागांझा संस्थेच्या सभागृहात होणार आहे.

Panaji Municipal Corporation Reservation
Goa - राज्यात प्रतिदिन सात रस्ते अपघात, रेंट-ए-कार व बाईक; भाडेतत्त्वावरील वाहनांमुळे रस्ते 'मृत्यूचे सापळे'

यासंदर्भातील माहिती गुरुवारी पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीप ताळवलीकर, गो. रा. ढवळीकर आणि नगरसेवक शुभम चोडणकर यांनी दिली. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते अशोक नाईक यांचा गौरव करण्यात येणार असून मिनेझिस ब्रागांझा संस्थेच्या सहकार्याने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याचे ढवळीकर यांनी सांगितले. अशोक नाईक यांनी गरिबी आणि संघर्षातून वाटचाल करत यशाचे शिखर गाठले.

Panaji Municipal Corporation Reservation
NHA Report 2026 | राज्याचा आरोग्य खर्च राष्ट्रीय सरासरीच्या तिप्पट

त्यांच्या जीवनातील अनुभवांवर आधारित 'अंधारातून प्रकाशाकडे नेणारी माझी जीवनयात्रा' या आत्मचरित्राचे लोकार्पणही यावेळी करण्यात येणार आहे. या पुस्तकाचे शब्दांकन गो. रा. ढवळीकर यांनी केले असून विशेष अतिथी उद्योजिका तथा साहित्यिका ज्योती बांदेकर यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. या गौरव सोहळ्यास अशोक नाईक यांचे चाहते, मित्रपरिवार तसेच नातेवाईकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रदीप ताळवलीकर यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news