Fake Apple Support Center | बांबोळीत आलिशान व्हिलावर पोलिसांचा धाडसी छापा! बनावट ॲपल सपोर्ट सेंटरचा पर्दाफाश

Fake Apple Support Center | बांबोळी येथे व्हिलावर छापा ; १० जणांना साहित्यासह अटक
Fake Apple Support Center
Fake Apple Support Center (file photo)
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा
सायबर क्राईम पोलिसांनी बांबोळी येथील अल्देया डी गोवा, या व्हिलावर छापा टाकून बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला. या कारवाईत १० जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून नऊ लॅपटॉप, नऊ मोबाईल फोन, एक टीपी-लिंक राऊटर आणि अनेक हँडसेट जप्त करण्यात आले.

Fake Apple Support Center
Goa News | गोव्यातील मडगाव, पणजी अन् वास्को कदंब बसस्थानकांचा कायापालट होणार; उल्हास तुयेकर यांची घोषणा

सायबर क्राईम पोलिसांना २१ सप्टेंबर रोजी या ठिकाणी ऑनलाईन बेकायदेशीर कारवाया सुरू असल्याची माहिती मिळाली होती. माहितीची पडताळणी केल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला असता तिथे बेकायदा कॉल सेंटर सुरू असल्याचे आढळून आले.
पोलिसांच्या माहितीनुसार, संशयित ॲपल सपोर्ट सेंटरचे कर्मचारी असल्याचे भासवून अमेरिकेतील नागरिकांना लक्ष्य करत होते. लॅपटॉप, मोबाईल, अन्य सेवा आणि बनावट अमेरिकन फोन नंबरच्या माध्यमातून पीडितांना त्यांच्या खात्यांमध्ये किंवा ॲपल उपकरणांमध्ये व्हायरस अथवा सुरक्षा समस्या असल्याचे सांगितले जात होते.

Fake Apple Support Center
Panaji Voter List | पणजी मतदारसंघातील मतदार यादीत फेरफार

तांत्रिक मदतीच्या नावाखाली गिफ्ट कार्ड्स, झेले, पेपल आणि यूएसडीटी द्वारे पैसे उकळल्याचा आरोप आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कुणाल ललितकुमार शाह (४१, शाहीभाग, अहमदाबाद), देवर्ष प्रवीण श्रीवास्तव (२१, नोएडा, उत्तर प्रदेश), अभिजीत अजित परमार (२५, गुजरात), ध्रुव शिवकुमार द्विवेदी (२९, आग्रा, उत्तर प्रदेश), राज डी. संगमा (२७, शिलाँग), श्रेयश लुडबे (२५, मालाड, मुंबई), ब्रिजेश भारत तेलैया (२८, गुजरात), जुड जॉन परेरा (३२, चिखली, मुरगाव), सोफेयान इक्बाल हुसेन लालू (१९, मेघालय) आणि रवी कृष्णा थापा (२७, मेघालय) यांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news