EVM Inspection | ईव्हीएम तपासणीवरून आरोप-प्रत्यारोप

EVM Inspection | सीईओ संजय गोयल यांनी आरोप फेटाळले
EVM
EVMPudhari
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यात ईव्हीएमची अनधिकृत तपासणी झाल्याचे आरोप मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. संजय गोयल यांनी फेटाळले आहेत. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या अभियंत्यांसह राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ईव्हीएमची प्रथम स्तर तपासणी निर्धारित प्रक्रियेनुसार १५ दिवसांत पूर्ण करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

EVM
URPro Card Goa Digital | यूआरप्रो कार्डसाठी केवळ 5 टक्के जमीनमालकांकडून कागदपत्रे सादर; पणजी, मडगावमधील सर्वेक्षणाचे वृत्त

प्रथम स्तर तपासणीनंतर ईव्हीएम सीसीटीव्ही निगरानी, राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची उपस्थिती आणि पोलिसांच्या सुरक्षेखाली सीलबंद केल्याचे गोयल यांनी सांगितले. सीलबंद ईव्हीएम पुन्हा उघडण्यासाठी कठोर नियमावली असून, त्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांसह संबंधित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची उपस्थिती आवश्यक असते.

त्यामुळे ईव्हीएमच्या अनधिकृत तपासणीसंदर्भातील आरोप निराधार असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, आपने नेते अमित पालेकर यांनी ईव्हीएम चाचणीदरम्यान कथित विसंगती आढळल्याचा दावा केला आहे.

EVM
URPro Card Goa Digital | यूआरप्रो कार्डसाठी केवळ 5 टक्के जमीनमालकांकडून कागदपत्रे सादर; पणजी, मडगावमधील सर्वेक्षणाचे वृत्त

तीन वेगवेगळ्या पक्षांना देण्यात आलेली १५ मते मतमोजणीदरम्यान एकाच पक्षाच्या नावाखाली नोंदवली गेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर संबंधित चाचणी थांबवण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

या कथित विसंगतीबाबत पालेकर यांनी भारतीय निवडणूक आयोगाकडे स्पष्टीकरण मागितले आहे. ईव्हीएम चाचणीदरम्यान नेमके काय घडले, याची स्पष्ट माहिती आयोगाने द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news