पणजी : जांबावली देवस्थानात 15 कोटींची अफरातफर प्रकरणी गुन्हा

जांबावली देवस्थानात 15 कोटींची अफरातफर प्रकरणी गुन्हा
Panaji news
जांबावली देवस्थानात 15 कोटींची अफरातफर प्रकरणी गुन्हा दाखलfile photo

पणजी : जांबावली येथील रामनाथ दामोदर देवस्थानच्या 2016-19 आणि 2019-22 या कार्यकाळातील व्यवस्थापकीय समितीने 15.09 कोटी रुपयांच्या पालखीच्या 56.68 किलो सोन्याच्या दागिन्यांची अफरातफर केली आहे. याप्रकरणी गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने (ईओसी) वरील समितीसह सोनार व इतरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आर्थिक गुन्हे विभागाने (ईओसी) दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी देवस्थानचे अ‍ॅटर्नी साईश हेगडे यांनी 27 ऑक्टोबर 2023 रोजी केपे पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती. ती तक्रार नंतर ईओसीकडे वर्ग करण्यात आली. त्यानुसार देवस्थानच्या 2016-19 आणि 2019-22 या कालावधीत अध्यक्ष प्रकाश एस. कुंदे, खजिनदार प्रशांत हेगडे, सचिव संदेश शेणवी कुंदे, अ‍ॅटर्नी दत्तप्रसाद अग्नी यांची व्यवस्थापकीय समिती होती.

Panaji news
Nashik Bribe News : 15 हजाराची लाच मागितल्या प्रकरणी दोन पोलिसांविरोधात गुन्हा

त्यानंतर 9 आगस्ट 2022 रोजी नवीन व्यवस्थापकीय समिती आली. वरील कालावधीत आमसभेने सोन्याची पालखी करण्याचे ठरवले होते. त्यानुसार त्या समितीने आभारण ज्वेलर्सला पालखी करण्यास सांगितले होते. वरील तत्कालीन समितीने याबाबतचा व्यवहार तसेच इतर माहिती नवीन समितीला दिली नव्हती. त्यानंतर चौकशी केली असता, तत्कालीन समितीने सोन्याच्या पालखीसाठी 15.09 कोटी रुपयांच्या 56.68 किलो सोन्याची अफरातफर केल्याचे समोर आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी उपअधीक्षक फ्रान्सिस कोर्त यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षण राजाशद शेख पुढील तपास करत आहेत.

Panaji news
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या ऑनलाईन बुकींगमध्ये १२ कोटींची अफरातफर; २ आरोपी विरोधात गुन्हा दाखल

गुन्ह्याप्रकरणी लावलेली कलमे

आर्थिक गुन्हा विभागाने देवस्थानच्या 2016-19 आणि 2019-22 या कालावधीतील अध्यक्ष प्रकाश एस. कुंदे, खजिनदार प्रशांत हेगडे, सचिव संदेश शेणवी कुंदे, अ‍ॅटर्नी दत्तप्रसाद अग्नी यांची व्यवस्थापकीय समितीसह आभारण जेल्वर्सचे मालक व इतरांविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 403, 406, 409 आणि 420 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

  • पालखीच्या 56.68 किलो सोन्याच्या दागिन्यांबाबत होती तक्रार

  • आर्थिक गुन्हा विभागाकडून कारवाई

  • संशयितांमध्ये देवस्थान समिती, सोनार यांचा समावेश

Panaji news
बेकायदेशीर घोडा गाडी शर्यंत प्रकरणी सरपंच उपसरपंचासह घोडे चालक-मालकांवर गुन्हा दाखल

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news