UCO Bank Fraud Goa | ईडीकडून 1.17 कोटींची मालमत्ता जप्त

UCO Bank Fraud Goa | यूको बँक सुवर्णकर्ज फसवणूक प्रकरणात कारवाई
Fraud Case
Fraud Case
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

बनावट सोन्याची दागिने तारण ठेवून यूको बँकेच्या सुवर्णकर्ज फसवणूक प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पणजी विभागीय कार्यालयाने मोठी कारवाई करत सुमारे १.१७ कोटींची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे.

Fraud Case
Health Minister Vishwajit Rane | नैराश्याबद्दल जागरूकतेसाठी राज्यातील 94 गावांमध्ये समुपदेशन

ही कारवाई पीएमएलए (मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा) अंतर्गत करण्यात आली आहे. ईडीच्या माहितीनुसार, हेमंत रायकर आणि गुंडू केळवेकर यांनी बनावट सोन्याच्या दागिन्यांचा वापर करून बँकेतून ३२ सुवर्णकर्जे मिळवण्यासाठी कट रचल्याचा आरोप आहे.

Fraud Case
Margao Carnival Parade 2026 | मडगावात 15 फेब्रुवारीला रंगणार कार्निव्हलचा उत्साह; सायंकाळी 4 वाजता परेडला होणार सुरुवात

या प्रकरणातील गुन्ह्यातून मिळालेल्या माहितीनुसार या रकमेचा अंदाज सुमारे २. ८१ कोटी इतका आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आर्थिक व्यवहार आणि संबंधित मालमत्तांचा तपशील तपासला जात आहे. ईडीच्या या कारवाईमुळे बँकिंग क्षेत्रातील फसवणुकीविरोधात कठोर पावले उचलली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news