Health Minister Vishwajit Rane | नैराश्याबद्दल जागरूकतेसाठी राज्यातील 94 गावांमध्ये समुपदेशन

Health Minister Vishwajit Rane | आरोग्यमंत्री विश्वजित राणे : 15 हजारांहून अधिक सत्रे
vishwajit-rane
vishwajit-ranePudhari File Photo
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील ९४ नैराश्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी गावांमध्ये सामुदायिक स्वयंसेवकाद्वारे १५ हजारांहून अधिक समुपदेशन सत्रे घेण्यात आली. ज्यात एकूण १.४२ लाख व्यक्तींची तपासणी करण्यात आली आणि त्यापैकी २२ हजारांहून अधिकजणांना नैराश्याचे निदान झाले, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली.

vishwajit-rane
Margao Carnival Parade 2026 | मडगावात 15 फेब्रुवारीला रंगणार कार्निव्हलचा उत्साह; सायंकाळी 4 वाजता परेडला होणार सुरुवात

बांबोळी येथे आरोग्य संचालनालयाने संगथ या संस्थेच्या सहकार्याने आयोजित राज्यस्तरीय मानसिक आरोग्य व कल्याण परिसंवादाचे उद्घाटन केल्यानंतर राणे बोलत होते. यावेळी आरोग्य संचालक डॉ. रुपा नाईक,

गोमेकॉचे अधिष्ठाता डॉ. आर. जयप्रकाश तिवारी, आरोग्य अधिकारी अभिजित नाडकर्णी, एनसीडीसीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संदेश मडकईकर, संगथचे सह-संस्थापक प्रा. विक्रम पटेल, संस्थेच्या प्रमुख डॉ. मेरी कॉनी डिसोझा आदी उपस्थित होते.

आरोग्यमंत्री राणे म्हणाले की, मानोसपाचार आरोग्य केंद्र, आरोग्य संचालनालय, गोमेकॉ या संस्थांद्वारे संगतच्या सहकाऱ्याने लोकांचे मानसिक आरोग्य चांगले राहाण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे राणे यांनी सांगितले.

vishwajit-rane
CM Pramod Sawant | कर्मचारी पेन्शन योजनेत सुसूत्रता आणा

टेली मानस प्रभावी उपक्रम...

नैराश्य हा आजार सर्व वयाच्या व्यक्तींना जाणवत असून गोवा राज्याने प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या सर्व स्तरांवर नैराश्य उपचार सेवा यशस्वीपणे विस्तार करून देशात आदर्श निर्माण केला आहे.

नैराश्येतून जाणाऱ्या व्यक्तीला योग्य समुपदेशनाची अत्यंत गरज असते, अनेकदा संबंधित व्यक्तींना समुपदेशनासाठी कुठे जावे हे माहीत नसते. त्यामुळे राज्यभरातील आरोग्य केंद्रात ही सेवा उपलब्ध केल्याचे सांगून टेली मानस हा उपक्रम प्रभावी मार्गदर्शन करत असून सरकार त्याला पूर्ण पाठिंबा देत आहे, असे राणे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news