गोवा : 1 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त; रशियन तरुणाला अटक

न्यायालयाने सुनावली ७ दिवसांची पोलिस कोठडी
Drugs worth Rs 1 crore seized
1 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्तPudhari File Photo

पणजी : प्रभाकर धुरी

कुठलाही कामधंदा न करता पॉश राहणे रशियन नागरिकाला महागात पडले. अमली पदार्थ विरोधी पथकाने त्याच्यावर पाळत ठेवली आणि तब्बल एक कोटी रुपयांच्या अमली पदार्थाचे थोथांड समोर आले. या रशियन ड्रग्ज एजंटचे नाव युरी कॉरितेम ( वय ४०) असे आहे. यावेळी पथकाने केलेल्या कारवाईत त्याला १ कोटी रुपये किंमतीच्या अंमलीपदार्थासह अटक केली आहे. मोरजी-पेडणे मार्गावरील चोपडे सर्कलजवळ ही कारवाई करण्यात आली. अशी माहिती पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिली. कारवाईवेळी त्याच्याजवळ 1.7 किलो वजनाचे हायड्रोपोनिक वीड हा घातक अंमली पदार्थ सापडला. त्याची किंमत सुमारे 85 लाख रुपये आहे. तसेच अतिरिक्त 300 ग्रॅम वजनाचे पोलेन्स जातीचे हायड्रोपोनिक विड सापडले. त्याची किंमत 13 लाख रुपये असून एकूण १.०३ कोटी रुपये किंमतीचा हा अंमली पदार्थ असल्याची माहिती अंमली पदार्थ विभागाच्या सूत्रांकडून देण्यात आली.

Drugs worth Rs 1 crore seized
नाशिकच्या तरुणाईवर अमली पदार्थांचा विळखा

संशयित आरोपी कोरितिन याचे शिवोली येथे वास्तव्य होते. तो कोणताच अधिकृत असा व्यवसाय करीत नव्हता. परंतु त्याचे राहणे हे अत्यंत रूबाबदार असायचे. त्यामुळे त्याच्याविषयी पोलिसांना संशय होता म्हणूनच अंमली पदार्थ विरोधी विभाग त्यावर पाळत ठेऊन होता. त्यानंतर पथकाला ड्रग्ज संदर्भात निश्चित अशी माहिती मिळाली आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार पोलिस उपनिरीक्षक दीनदयाळ रेडकर याच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.

Drugs worth Rs 1 crore seized
गोवा : ६७ लाखांचे अमली पदार्थ जप्त; नायजेरियन तरुणाला अटक

गोव्यात केली अमली पदार्थांची लागवड

कॉरितेम 2016 मध्ये गोव्यामध्ये आला होता. तो मोरजी, हरमल परिसरातील क्लबमध्ये डीजेचे काम करायचा. यानंतर त्याने ते काम सोडले आणि 2019 मध्ये रशियाला गेला. तिथून तो थायलंडला गेला. तिथे त्याने हायड्रोपोनिक वीडची लागवड करण्यास सुरवात केली. तिथे फायदा कमी मिळत असल्याने तो फेब्रुवारी 2023 मध्ये बायको आणि 6 वर्षाच्या मुलासह पुन्हा गोव्यामध्ये आला. शिवोली येथे त्याने भाड्याने घर घेतले तर पाल्ये पेडणे येथे जमीन भाड्याने घेऊन तेथे नर्सरी तयार केली. त्या नर्सरीत त्याने आंतरराष्ट्रीय संकेतस्थळावरून अमली पदार्थाच्या बिया मागवल्या आणि त्यापासून नर्सरीत रोपे तयार केली. सोशल मीडिया, टेलिग्राम याचा वापर करुन त्याने गोवा आणि परदेशात अमली पदार्थ विक्री सुरु केली. त्याची रक्कम तो क्रिप्टो करंसीच्या माध्यमातून घेत असे. त्यामुळे कुठलाही कामधंदा न करता तो पॉश फिरत असल्याने पोलिसांचा संशय बळावला आणि अखेर अलगद जाळ्यात आला. अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस अधीक्षक नेल्सन अल्बुकर्क, पोलिस निरीक्षक साजित पिल्लई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दीनदयाळ रेडकर याच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news