Goa Dr Ketan Bhatikar death | डॉ. केतन भाटीकर यांचा सर्पदंशाने मृत्यू, दांडेलीहून येताना नेमके काय घडले?

दांडेलीतून परतत असताना अनमोड घाटात घटना, आकस्मिक घटनेने गोवा हळहळला; मान्यवरांकडून दुःख व्यक्त
Dr Ketan Bhatikar
फोंडा : १) भाटीकर कुटुंबीयांचे सांत्वन करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतpudhari photo
Published on
Updated on

पणजी : फोंडा मतदारसंघातील राजकीय नेते आणि समाज कार्यकर्ते म्हणून परिचित असलेले डॉ. केतन भाटीकर डॉ. केतन भाटीकर यांचे शुक्रवारी पहाटे ३.३० च्या सुमारास अनमोड येथे सर्पदंशाने मृत्यू झाला. दांडेलीहून परतताना ही दुर्दैवी घटना घडली. त्यांच्या आकस्मिक निधनाबद्दल राज्यभर हळहळ व्यक्त केली जात आहे.

आमदार होण्याची त्यांना प्रबळ इच्छा होती. त्यासाठी त्यांनी फौंडा मतदारसंघात भरीव असे कामही केले होते. २०२२ मध्ये त्यांनी निवडणूक लढवली. मात्र, ते रवी नाईक यांच्याकडून अवघ्या ७० मतांनी पराभूत झाले. भाजपची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी मगोची उमेदवारी घेतली होती. त्यानंतर रवी नाईक यांचे आकस्मित निधन झाले आणि पोटनिवडणूक जाहीर झाली. मगो पक्षाने भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करताना रवी नाईक यांच्या पुत्राला भाजपने उमेदवारी द्यावी, त्याला मगो पाठिंबा देईल, असे जाहीर केल्यामुळे भाजप व मगोची उमेदवारी मिळणार नसल्याने डॉ. भाटीकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला व उमेदवारी मिळवली. प्रचार सुरू झाला, मात्र न्यायालयाने पोटनिवडणूक रद्द केली आणि डॉ. भाटीकरांची संधी गेली. २०२७मध्ये जिंकण्याचे ध्येय समोर ठेवून ते काम करत होते. मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते आणि डॉ. भाटीकर यांचे अकाली निधन झाले.

काँग्रेसकडून डॉ. भाटीकर यांना श्रद्धांजली

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार एल्टन डिकॉस्टा, उपाध्यक्ष एम. के. शेख, उपाध्यक्ष सुनील कवठणकर, सेवादल अध्यक्ष राजन घाटे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत डॉ. केतन भाटीकर यांना श्रद्धांजली वाहिली. या नेत्यांनी काँग्रेस पक्ष आणि समाजासाठी दिवंगत डॉ. केतन भाटीकर यांच्या योगदानाचे आणि समर्पित सेवेचे स्मरण केले. त्यांच्या शोकाकुल कुटुंबाप्रति भावपूर्ण शोकसंवेदना व्यक्त केल्या.

Dr Ketan Bhatikar
Goa Monsoon Update - राज्यात मान्सूनचे ३१ रोजी आगमन
फिजिओथेरपिस्ट डॉ. केतन भाटीकर यांच्या अकाली निधनाची बातमी ऐकून तीव्र धक्का बसला आणि दुःख झाले. त्यांचे जाणे ही वैद्यकीय क्षेत्रासाठी एक मोठी हानी आहे. या कठीण काळात त्यांच्या कुटुंबीयांना व मित्रांना माझ्या संवेदना. त्यांच्या आत्म्यास सद्‌गती लाभो.
- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.

नेमके काय घडले?

दांडेली येथून रात्री परतत असताना त्यांनी लघुशंकेसाठी गाडी रस्त्याच्या बाजूला उभी केली आणि गाडीतून बाहेर आल्याबरोबर त्यांचा मोबाईल खाली पडला असता, तो उचलतानाच त्यांना सर्पदंश झाल्याचे त्यांच्या सोबत असलेल्या व्यक्त्तीने सांगितले. त्यानंतर त्यांना धारबांदोडा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले गेले; पण तोपर्यंत उशीर झाला होता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

डॉ. केतन भाटीकर अनंतात विलीन

फोंडा : गोव्याहून दांडेली कर्नाटक येथे मित्राला भेटण्याबरोबरच इतर कामासाठी गेलेल्या फोंड्यातील एक राजकीय नेते डॉ. केतन भाटीकर यांचे घरी परतताना शुक्रवारी रात्री एकच्या सुमारास वाटेत जहरी सापाने देश केल्याने दुर्दैवी निधन झाले. सायंकाळी फोंड्यातील मुक्तिधाम स्मशानभूमीत हजारोंच्या संख्येने उपस्थिता समक्ष अंत्यसंस्कार करण्यात आले. वडील कीर्तीकुमार भाटीकर यांनी मुखाग्नी दिला. त्यांच्या पश्चात आई कादंबरी भाऊ कौतुक व इतर परिवार आहे. केतन भाटीकर यांचे निधन झाल्याची वार्ता सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली आणि बेतोडा फोंडा रस्त्यावरील भाटीकर यांच्या निवासस्थानी समर्थक कार्यकर्ते नातेवाईक आणि मित्रपरिवाराची प्रचंड गर्दी उसळली. या गर्दीला आवरण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले. अल्पावधीतच राजकारणाकडे प्रवास राजकारणात येण्यापूर्वी समाजकारणात भाटीकर सक्रीय होते.

मगो पक्षाचे सक्रीय कार्यकर्ता म्हणून वावरताना त्यांनी फोंडा पालिका निवडणुकीवेळी रायझिंग फोंडा संघटना सुरू केली आणि सात नगरसेवक निवडून आणले. त्यापूर्वी पणजी मतदारसंघात गोवा सुरक्षा मंचच्या बॅनरखाली विधानसभा निवडणूक लढवली मात्र पराभूत झाले. त्यानंतर फोंड्यातील एक दिग्गज नेते रवी नाईक यांच्या विरोधात फोंड्याची निवडणूक मगो पक्षातर्फे लढवली तेथे फक्त ७७मतांनी भाटीकर पराभूत झाले. त्यानंतर मगोशी फारकत घेत भाटीकर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला पण ही निवडणूकच रद्द झाली आणि आमदार होण्याचे स्वप्न भंग पावले.

शिक्षण, समाजकारणात ठसा

एक उत्कृष्ट फिजिओथेरपिस्ट म्हणून लौकिक मिळवलेल्या केतन भाटीकर यांचे माध्यमिक शिक्षण आल्मेदा हायस्कूल तेथून उच्च माध्यमिक शिक्षण फर्मागुढीच्या जीव्हीएम महाविद्यालयात तर फिजिओथरपिस्टचे शिक्षण बेळगावच्या एसडीएम फिजिओथेरपी महाविद्यालयात झाले तर कैंट इंग्लंडमध्ये या विषयात पुढील शिक्षण घेतले. त्यानंतर स्पार्क नावाने फिजिओ सेंटर फोंड्यात सुरू केले.

Dr Ketan Bhatikar
Goa Sattari storm news | सत्तरी तालुक्याला वादळीवाऱ्याचा तडाखा

१५ तारीख धोक्याची !

फोंड्यासाठी १५ तारीख धोक्याची ठरली आहे. १५ फेब्रुवारी फोंड्याचे माजी आमदार लवू मामलेदार, रवी नाईक हे १५ ऑक्टोबर तर आता डॉ. केतन भाटीकर हे १५ मे रोजी निधन पावले म्हणूनच १५ तारखेविषयी फोंड्यात चर्चा सुरू होती.

काँग्रेसचा एक चांगला नेता एक धडपडी कार्यकर्ता गमावला आहे. हे दुःख न पचवण्यासारखे.

- कॅ. विरिएतो फर्नाडिस, खासदार द. गोवा.

एक चांगला मित्र गमावला. लहानपणापासून आम्ही एकत्र होतो, असा मित्र मिळणे कठीण.

- राजेश बेरेकर, काँग्रेस नेता, फोंडा.

एक चांगला राजकारणी आणि एक चांगला माणूस फोंडेकरांनी गमावला.

- रितेश नाईक, माजी नगराध्यक्ष फोंडा.

एक चांगला राजकारणी एक चांगला समाजकारणी म्हणून केतन भाटीकर यांनी नाव कमावले होते.

- विजय सरदेसाई, गोवा फॉरवर्ड, आमदार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news