Goa Robbery Caes | दरोड्यातील सहाव्या संशयिताला 14 दिवस न्यायालयीन कोठडी

Goa Robbery Caes | दोनापावला व म्हापसा दरोडाप्रकरणी दिल्लीहून गोव्यात आणलेल्या संशयित मोहम्मद नाझीर याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली.
Jalna News
Jalna News : लाचखोर अधिकाऱ्यांना १२ जून पर्यंत न्यायालयीन कोठडीचे आदेशfile photo
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

दोनापावला व म्हापसा दरोडाप्रकरणी दिल्लीहून गोव्यात आणलेल्या संशयित मोहम्मद नाझीर याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. सर्व सहाही दरोडेखोर न्यायालयीन कोठडीत असून लवकरच त्या सर्वांना म्हापसा दरोडाप्रकरणीच्या तपासात पोलिस कोठडी घेतली जाणार असल्याची माहिती क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Jalna News
Gold Theft News| दोनापावला, म्हापसा दरोडा प्रकरणी आणखी तीन बांगलादेशींचा शोध सुरू

दोनापावला येथे दरोडेखोरांनी बंगल्यातील वृद्धांना धमकावण्यासाठी वापरलेली शस्त्रे दरोडेखोरांच्या उपस्थितीत जप्त करण्यात आली आहेत. या बंगल्यातून चोरलेले सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम त्यांच्याकडून जप्त करण्यात पोलिसांना अपयश आले आहे. या दरोडेखोरांनी बंगल्यात प्रवेश करताना चेहऱ्यावर बुरखे घातले होते त्यामुळे त्यांची ओळखपरेड करणे शक्य नाही. त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले आहेत. त्यातील काहींचे ठसे बंगल्यातील कपाटावर आढळून आले होते.

Jalna News
Dona Paula Robbery | गोव्यातील दरोड्याचा 'दिल्ली कनेक्शन' उघड! सातव्या दरोडेखोरासाठी क्राईम ब्रँचचे पथक दिल्लीला रवाना

दोनापावला दरोडाप्रकरणी न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले असले तरी अजूनही तपास सुरू आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पुरवणी आरोपपत्र सादर केले जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दोनापावला व म्हापसा दरोडाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांनी दरोडे घातल्याने त्यांना म्हापसा प्रकरणात न्यायालयात अर्ज करून पोलिस कोठडी घेण्याची परवानगी घेतली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news