DMT Seizure Goa | कोरगाव येथे एक कोटीचे डीएमटी ड्रग्ज जप्त

DMT Seizure Goa | पेडणे पोलिस, एनसीबीची संयुक्त कारवाई
Goa DMT Drug Seized
Goa DMT Drug Seized Pudhari
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

पेडणे पोलिस आणि ब्युरो नार्कोटिक्स कंट्रोल (एनसीबी) यांच्या संयुक्त पथकाने कोरगाव-पेठवाडा येथे सुमारे एक कोटी रुपयांचे डीएमटी ड्रग्ज जप्त केले. याप्रकरणी इना वोल्कोवा या वेलारुसच्या नागरिकाला अटक करण्यात आली आहे.

Goa DMT Drug Seized
Goa Night Club Fire : लुथरा बंधू थायलंडमध्ये अखेर जेरबंद

९ ते १० डिसेंबर रोजी दरम्यान एनसीबी आणि पेडणे पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. इना वोल्कोवा हिच्या ताब्यातून ड्रग्ज आणि ते तयार करण्यासाठी लागणारे साहित्य मोठ्या प्रमाणात हस्तगत करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये ९३३ ग्रॅम वजनाचे, गडद तपकिरी रंगाचे डीएमटी लिक्वीड आणि ३८८ ग्रॅम वजनाचे ब्राऊन रंगाचे द्रव स्वरूपातील डीएमटी यांचा समावेश आहे.

Goa DMT Drug Seized
Night Club Fire Case | हे प्रकरण अत्यंत गंभीर! हडफडेतील दुर्घटनाप्रकरणी रोहिणी न्यायालयाचे लुथरांवर कडक शब्दात ताशेरे

याशिवाय, ड्रग्ज काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ४१ ग्रॅम कच्च्या लाकडाच्या साली आणि ८ ग्रॅम वजनाच्या सुकवलेल्या मशरूम्स (यांचा उपयोग डीएमटी द्रवात केला जात असल्याचा संशय आहे) देखील जप्त करण्यात आल्या आहेत.

जप्त करण्यात आलेल्या या सर्व मालाची आंतरराष्ट्रीय बाजारात अंदाजित किंमत सुमारे एक कोटी रुपये आहे. याप्रकरणी एनसीबीने एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला असून, बेलारुसची नागरिक इना वोल्कोवा (रा. पेठवाडा, कोरगाव, पेडणे) हिला अटक करण्यात आली आहे. पर्वरी एनसीबीचे पोलिस निरीक्षक मोहन राणे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news