BITS Pilani Issue | गोव्यात 2027 ला काँग्रेसचंच सरकार येणार; 'गोंय राखण यात्रेत' डी. के. शिवकुमार यांचा दावा

BITS Pilani Issue | कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार : गोंय राखण यात्रेत सहभाग
BITS Pilani Issue
BITS Pilani Issue
Published on: 
Updated on: 


दाबोळी : पुढारी वृत्तसेवा

गोव्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मोठा बदल घडवून आणण्याचा प्रयत्न गोवा प्रदेश काँग्रेस पक्ष 'गोंय राखण यात्रे'द्वारे करत आहे. काँग्रेस पक्ष संविधान पाळणारा पक्ष असल्याचे जगप्रसिद्ध आहे. मी मागचा विचार करत नसून मी पुढचा विचार करत आहे. येणाऱ्या काळात गोवा विकसित राज्य बनविण्यासाठी येथील जनतेने एकसंघ राहून काँग्रेस पक्षाला साथ देण्याचे आवाहन कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी कुठ्ठाळीत गोंय राखण यात्रेच्या जाहीर सभेत केले.

BITS Pilani Issue
Dabolim Airport | दाबोळी विमानतळावर आगीचा थरार! शॉर्टसर्किटमुळे गोदामात भडका; प्रवाशांमध्ये मोठी घबराट

गोवा प्रदेश काँग्रेस पक्षाची 'गोंय राखण यात्रा' गुरुवार (दि. ८) रोजी कुठ्ठाळी मतदारसंघात संपन्न झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी उपस्थिती लावली होती.
ते म्हणाले की, काँग्रेस पक्ष लोकशाही मार्गाने कार्य करणारा पक्ष आहे. या पक्षाने भारत देशात क्रांती घडवून आणली आहे. गोव्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष बहुमताने निवडून येणार असल्याची खात्री उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी व्यक्त केली आहे. गोव्यात चांगले प्रशासन निर्माण करण्यासाठी येथील जनतेने काँग्रेस पक्षाला पाठिंबा देण्याचे आवाहन कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी केले.

गोवा प्रत्येक क्षेत्रात अपयशी ठरत आहे. याचे मुख्य कारण येथील भ्रष्ट भाजप सरकार असल्याची माहिती डी. के. शिवकुमार यांनी दिली. 'मत चोरी' केल्याने भाजप विविध राज्यात सरकार स्थापन करत आहे. तसेच सूड बुद्धीचे राजकारण करून निवडणूक आयुक्तांना आपल्या बाजूने घेऊन मतदारांची नावे मतदार यादीतून वगळत असल्याची टीका त्यांनी केली.

काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, अध्यक्ष मल्लिकार्जुन खगे वगळण्यात आलेली नावे पुन्हा मतदार यादीत समावेश करण्यासाठी लढत असल्याचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सांगितले. यावेळी अमरनाथ पणजीकर, प्रतिमा कुतिन्हो, ओलेसियो सिमोईश, प्रतीक्षा खलप, अर्चित नाईक, डॉ. प्रमोद साळगावकर व इतरांची भाषणे झाली.

"आमचे सरकार गोव्यात आल्यास येथे उच्च दर्जाचे हॉस्पिटल उभारणार आहे. २०२७ मध्ये काँग्रेस निश्चित सरकार स्थापन करणार आहे."

- युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते

BITS Pilani Issue
Goa Flight Cancellation 2026 |इराण-इस्रायल संघर्षामुळे गोव्याचे विमान उड्डाण 'ठप्प'; दाबोळी अ न् मोपा विमानतळावरून अनेक फ्लाईट्स रद्द

कुठ्ठाळीवासीयांवर सरकारचा अन्याय : विरिएतो

दक्षिण गोवा खासदार विरिएतो फर्नांडिस यांनी सांगितले की, कुठ्ठाळी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचे सेवन होत आहे. त्यामुळे बिट्स पिलानीचे विद्यार्थी अमली पदार्थांचे सेवन करून प्राण गमवत आहे. भाजप सरकार दुपदरी रेल्वेमार्ग करून कुठ्ठाळी मतदारसंघातील रहिवाशावर अन्याय करत आहे. हा सरकार कोळसा माफियाचा असल्याची माहिती फर्नांडिस यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news