Diwali Market | वास्कोतील दीपावलीचा बाजार आता श्री दामोदर ट्रस्टच्या जागेत भरणार; आमदार कृष्णा साळकर यांची महत्त्वाची घोषणा

Diwali Market | आमदार दाजी साळकर; मॉडर्न मार्केट आग दुर्घटनेनंतर पुन्हा पाहणी, आजपासून भरणार बाजार
Diwali Market | वास्कोतील दीपावलीचा बाजार आता श्री दामोदर ट्रस्टच्या जागेत भरणार; आमदार कृष्णा साळकर यांची महत्त्वाची घोषणा
Published on: 
Updated on: 

दाबोळी : पुढारी वृत्तसेवा
येत्या रविवारी राज्यात दीपावली उत्सव साजरा करण्यात येणार असल्याने वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वास्को বাজারেরची पाहणी केली. तसेच यंदा दीपावलीचा संपूर्ण बाजार शहरातील महसूल विभागाच्या देव दामोदर ट्रस्टच्या जागेत भरवण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

Diwali Market | वास्कोतील दीपावलीचा बाजार आता श्री दामोदर ट्रस्टच्या जागेत भरणार; आमदार कृष्णा साळकर यांची महत्त्वाची घोषणा
Kazakhstan Charter Flight | कझाकस्तानहून आलेल्या पहिल्या चार्टर विमानाचे दाबोळी विमानतळावर पर्यटन खात्याकडून दिमाखदार स्वागत

सर्व विक्रेत्यांनी मंगळवार (दि. ३) पासून नवीन बाजारात आपला व्यवसाय मुरगाव पालिकेच्या नियमनुसार थाटावा, असे आमदार साळकर यांनी सांगितले. वास्कोत गेल्या आठवड्यात मॉडर्न मार्केटमध्ये आग लागून जी दुर्घटना घडली, तशी दुर्घटना पुन्हा घडू नये, यासाठी वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, मुरगावचे मामलेदार प्रविणजय पंडित, मुरगावचे पोलिस अधीक्षक गुरुदास कदम,

पोलिस निरीक्षक वैभव नाईक, अग्निशमन दलाचे प्रमुख दिलीप बिचोलकर, मुरगाव पालिकेचे अभियंता देसाई, सेनेतरी निरीक्षक महेश कुडाळकर, पालिका निरीक्षक सचिन पडवळ, माजी नगराध्यक्ष गिरीश बोरकर, माजी नगरसेविका शमी साळकर व बाजारातील विक्रेते उपस्थित होते.

Diwali Market | वास्कोतील दीपावलीचा बाजार आता श्री दामोदर ट्रस्टच्या जागेत भरणार; आमदार कृष्णा साळकर यांची महत्त्वाची घोषणा
Dabolim Airport | दाबोळी विमानतळावर आगीचा थरार! शॉर्टसर्किटमुळे गोदामात भडका; प्रवाशांमध्ये मोठी घबराट

वास्कोत रविवार-सोमवार साजरी होणाऱ्या दीपावलीनिमित्त भरणारा बाजार यंदा महसूल विभागाच्या जागेत मंगळवार (दि. ३) पासून भरायला सुरुवात होणार असल्याचे आमदार साळकर यांनी सांगितले. देव दामोदर ट्रस्टच्या एका बाजूच्या शेड मध्ये दीपावलीचा मुख्य बाजार तर दुसऱ्या शेडमध्ये फटाके, फुले, आकाशकंदील व इतर साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात येणार असल्याचे आमदार साळकर यांनी सांगितले.

नवीन मार्केटमध्ये व्यवसाय करा : साळकर

गेल्या अनेक वर्षांपासून वास्कोत दीपावलीचे सामान विकण्यासाठी येणाऱ्यांनी नवीन मार्केटमध्ये व्यवसाय करण्याचे आवाहन आमदार साळकर यांनी केले. तसेच तालुक्यातील सर्व नागरिकांनी शहरातील मध्यभागी असलेल्या नवीन दीपावलीच्या बाजारात येऊन खरेदी करावी, असे आवाहनही आमदार साळकर यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.