Goa News
Goa News

Goa News | पणजीत तीन वाहनांचा विचित्र अपघात

Goa News | दोघे जखमी; वाहनांचे मोठे नुकसान
Published on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

येथील दिवजा सर्कलजवळ सोमवारी रात्री तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. त्यात दोन कार, तर एका दुचाकीचा समावेश आहे. भरधाव वेगाने आलेल्या महागड्या कारची समोरून येणाऱ्या दुसऱ्या कारला उजव्या बाजूने जोरदार धडक बसली.

Goa News
Vasco News | जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही वास्कोतील ते गेट 'जैसे थे'च

यात दोन्ही कारच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. तसेच दोन्ही कारचे पुढील उजव्या बाजूचे टायर तुटून पडले एका होते. या अपघातात दुचाकीस्वाराचा नाहक अपघात झाला. त्याच्या दुचाकीचेही मोठे नुकसान झाले. भरधाव वेगाने आलेल्या महागड्या कारमध्ये दोघे प्रवासी होते. अपघातानंतर एअर बॅग उघडल्याने त्यांना दुखापत झाली नाही. मात्र, दुसरी कार आणि दुचाकीस्वार यांना दुखापत झाली. जखमींना बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात उपचारासाठी नेण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news