Digital Arrest Fraud | 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली पणजीतील व्यक्तीला 60 लाखांचा गंडा; सातारा येथून भामटा गजाआड

Digital Arrest Fraud | साताऱ्यात जाऊन संशयिताच्या मुसक्या आवळल्या
Digital Arrest Scam
Digital Arrest Scam | ‘डिजिटल अरेस्ट’ची देशव्यापी चौकशी सीबीआय करणार
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

पणजी येथील एका व्यक्तीला डिजिटल अरेस्टच्या नावाखाली ६० लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या सातारा, महाराष्ट्र येथील एका सायबर भामट्याला सायबर गुन्हे विभागाच्या पोलिस पथकाने अटक केली. अक्षय सुरेश निकम (वय ३३, रा. जि. प. शाळेसमोर, ताराळे, कोंजावडे, पाटण, सातारा) असे संशयिताचे नाव आहे.

Digital Arrest Scam
CM Pramod Sawant Goa | गोव्याच्या आरोग्य सेवेत मोठी झेप! आता प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंत मिळणार सर्व सुविधा

दि. २० फेब्रुवारी २०२६ पूर्वी संशयिताने एका व्हॉटस्अॅप मेसेजद्वारे आणि इतरांनी तक्रारदाराशी व्हॉटस्अॅप कॉलद्वारे संपर्क साधला आणि तक्रारदाराने त्यांच्याकडून पैसे घेतल्याचा खोटा आरोप केला.

त्यानंतर, इतर आरोपींनी सीबीआय मुंबईचे अधिकारी व मॅजिस्ट्रेट असल्याचे खोटे भासवून, तक्रारदाराची वैयक्तिक माहिती, मनी लॉड्रिंग प्रकरणात गुंतलेली असल्याची माहिती दिली आणि व्हिडीओ कॉलवरून त्याच्यावर पाळत ठेवली जात असल्याची धमकी दिली, तसेच वेगवेगळ्या दोन बँक खात्यांमध्ये आरटीजीएस व्यवहाराद्वारे ६० लाख रुपये हस्तांतरित करून कथित प्रकरण मिटवण्यासाठी तक्रारदारावर दबाव आणला.

Digital Arrest Scam
CM Pramod Sawant Goa | गोव्याच्या आरोग्य सेवेत मोठी झेप! आता प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंत मिळणार सर्व सुविधा

पोलिस उपनिरीक्षक अनिल पोळेकर, हवालदार अनय नाईक आणि पोलिस कॉन्स्टेबल विनय आमोणकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सातारा येथे जाऊन अक्षय सुरेश निकम याच्या मुसक्या आवळल्या. सहायक पोलिस अधीक्षक बी. व्ही. श्रीदेवी, सायबर क्राईमचे पोलिस अधीक्षक राजू राऊत देसाई यांच्या देखरेखीखाली पोलिस निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्यामार्फत पुढील तपास सुरू आहे.

एकूण 3.10 कोटींची फसवणूक

संशयिताच्या खात्यात ४६ लाख रुपये जमा झाले होते. ते नंतर त्याच्या साथीदारांच्या अनेक खात्यांत वळवण्यात आले. हे खाते मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा येथील इतर १२ सायबर फसवणुकीच्या प्रकरणांशी जोडलेले आहे, ज्यात एकूण ३.१० कोटी रुपयांची फसवणूक झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news