Digital Arrest Fraud | डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून 2.05 कोटींचा गंडा

Digital Arrest Fraud | एकाची डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून 63 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे चौकशीत उघड झाले.
Goa news
Goa news
Published on
Updated on
Summary

• डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून दोन प्रकरणांत २.०५ कोटींची फसवणूक उघड.
• सीबीआय व सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांना गंडा.
• आसाममधून दोन आरोपी अटक; आधीही सायबर गुन्ह्यांत सहभाग.
• एकाच आयएमईआयवर अनेक मोबाईल नंबर वापरून देशभर फसवणूक.

पणजी : राज्यातील सायबर क्राईम आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या पथकाने आसाममधील पोलिसांच्या मदतीने सीबीआय आणि सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारी असल्याचे भासवून डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून एका महिलेची १ कोटी ४२ लाख ४ हजार ८६८ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघा संशयितांना आसाममधून अटक केली.

Goa news
Pramod Sawant | आगामी विधानसभा, लोकसभा जिंकणारच

त्यांनीच आणखी एकाची डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून ६३ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे चौकशीत उघड झाले. दोन्ही फ्रॉडमधील रक्कम २ कोटी ५ लाख ५४ हजार ८६८ एवढी आहे. फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील अशदुल इस्लाम (२४ वर्षे, रा. नागाव, आसाम) व यास्मिन अहमद, (३२ वर्षे, रा. मोरीगाव, आसाम) या दोघांना अटक केली असून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.

डिचोली येथील रहिवाशाच्या तक्रारीवरून, बीएनएसच्या कलम ३१८(४), ३१९(२) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६-डी अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास देयकर, पोलिस कॉन्स्टेबल आरिफ आगा, रुपेश गायकवाड व प्रकाश यांच्या विशेष पथकाने संशयित आरोपींचा शोध घेऊन त्यांना नागाव, आसाम येथून अटक केली. यापूर्वी त्यांना अशाच प्रकारच्या सायबर फसवणूक कृत्यांसाठी नागाव पोलिसांकडून अटक करण्यात आली होती.

Goa news
Goa Land Conversion | राज्यातील भूरुपांतरण त्वरित थांबवा

त्या प्रकरणात ३५८ सिमकार्ड, ५ मोबाईल फोन, १ वाय-फाय राउटर, १ डीव्हीआर आणि १ लॅपटॉप जप्त करण्यात आले होते. शिवाय तेच मोबाईल क्रमांक गोव्यात दाखल असलेल्या दुसऱ्या ६३ लाख ५० हजार रुपयांच्या फसवणूक प्रकरणात वापरले गेले होते. पुढील तपास पोलिस निरीक्षक दीपक पेडणेकर सायबरच्या सहायक पोलिस अधीक्षक श्रीदेवी बीव्ही आणि पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या देखरेखीखाली करीत आहेत.

एक आयएमईआय मोबाईल नंबर

अनेक संशयित एकाच आयएमईआय असलेल्या उपकरणांचा वापर करून अनेक मोवाईल नंबर चालवत होते, जे देशभरातील अनेक सायबर फसवणुकीच्या तक्रारींशी जोडलेले आढळले. हे दोघे देशभरातील आर्थिक फसवणुकीच्या साखळीतील मुख्य आरोपी आहेत. त्यामुळे अनेक प्रकरणे उघड होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news