Digambar Kamat | महामार्ग ओलांडणे आता होणार सोपे! सांकवाळमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी हायटेक फूटब्रिजची तयारी

उपासनगर सांकवाळ येथे मंत्री कामत यांनी केली महामार्गाची पाहणी
Digambar Kamat
Digambar Kamat
Published on
Updated on

वास्को : पुढारी वृत्तसेवा

उपासनगर-सांकवाळ येथे ओलांडण्यासाठी महामार्ग एस्केलेटरसह फूटब्रिज बांधण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी ठेवला. जेणेकरून पादचारी विशेषतः ज्येष्ठ नागरिक व शालेय विद्यार्थ्यांची अडचण दूर होईल. तेथे वाहनांच्या ये-जासाठी भुयारी रस्ता बांधण्यासाठी अभ्यास केला जाईल, असे कामत यांनी सांगितले.

Digambar Kamat
BJP Nashik Politics 2026 | नाशिक मनपात 'मुंबई-पुणे' पॅटर्न? सभागृह नेतेपदासाठी भाजपमध्ये मोठ्या हालचाली, 'या' नावांची चर्चा

तेथे भुयारी रस्ता कसा बांधता येईल, यासंबंधी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना दोन पर्याय तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. उपासनगर येथे रंबलर्स घालण्याचे निर्देश त्यांनी दिले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे सध्या उपासनगर-सांकवाळ ते बोगमाळो-दाबोळी महामार्गावर नवीन आराखड्यानुसार बांधकाम सुरू झाले. आहे.

उपासनगर सांकवाळ येथील रस्ता बांधकाम आराखड्यासंबंधी कोणालाही अधिक माहिती नाही. या आराखड्यासंबंधी स्थानिकांना तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी, कुठ्ठाळीचे आमदार आंतोनियो वास यांनाही विश्वासात घेण्यात आले नाही. तेथील महामार्गाच्या जुन्या आराखड्यामध्ये बदल करताना नव्याने तेथे बांधकाम सुरू करण्यात आल्याने तेथील स्थानिकांना काही समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

तेथे महामार्ग कसा ओलांडावा यासबंधी कोणालाही काहीच माहिती नाही. जेणेकरून तेथे अपघात होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी इत्यादिनी महामार्ग कसा ओलांडावा, असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे. तेथे भुयारी रस्ता बांधण्यात यावा जेणेकरून तेथील नागरिकांची समस्या दूर होईल, अशी मागणी तेथील रहिवाशांनी केली होती.

यासंबंधी मुख्यमंत्री डॉ. सावंत, सार्वजनिक बांधकाम खात्याच मंत्री कामत, आमदार वाझ तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला निवेदने देण्यात आली होती. याप्रकरणी गेल्या महिन्याभरात कोणताही प्रतिसाद न लाभल्याने रविवारी सकाळी संबंधित रहिवाशांनी आमदार वास यांच्यासह उपासनगर येथील रस्त्याची पाहणी केली होती.

बुधवारी (दि. ४) सकाळी मंत्री कामत यांनी उपासनगर येथे येऊन पाहणी केली. याप्रसंगी आमदार वाझ, जिल्हा पंचायत सदस्य सुनील गावस, पंच तुळशीदास नाईक, माजी सरपंच नारायण नाईक, सामाजिक कार्यकर्ते अच्युत नाईक, माजी सरपंच रमाकांत बोरकर वगैरे तेथे उपस्थित होते.

कामत यांनी मडगाव येथे ज्याप्रमाणे रेलमार्गावर फूटब्रिज बांधण्यात आला आहे. त्या धर्तीवर उपासनगर येथे फूटब्रिज बांधण्यासंबंधी चर्चा केली. जर या फूटब्रिजची उंची अधिक होत असल्यास तेथे एस्केलेटर सुविधा करण्यात येईल. तेथे भुयारी रस्ता कोठे व कसा बांधण्यासंबंधी चाचपाणी करण्यात येईल. यासंबंधी तेथील तांत्रिक बाबींचा विचार करून दोन पर्याय तयार करण्यात येईल.

तयार त्या करण्यात आलेल्या आराखड्यासंबंधी आमदार वाझ व इतरांना माहिती देण्यात येईल. त्यांच्या सहमतीने पुढील कृती करण्यात येईल, असे कामत यांनी सांगितले. भुयारी रस्त्यासंबंधी जो आराखडा तयार करण्यात येईल त्यासंबंधी चर्चा करण्यासाठी आमदार वाझ यांच्यासह सहा सातजणांची समिती निवडण्यात येईल.

त्या समितीला सदर आराखडयांचे सादरीकरण करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. अशाप्रकारचे प्रकल्प जेव्हा हाती घेतात, तेव्हा तेथील स्थानिक आमदार, इतर लोकप्रतिनिधी, स्थानिक रहिवाशी व इतरांशी चर्चा करण्याची गरज आहे. जेणेकरून त्यांच्या सूचनांनुसार काही गोष्टीमध्ये सुधारणा करता येते, असे त्यांनी सांगितले.

Digambar Kamat
Mandavi Casino | मांडवीत नवा कॅसिनो येणार नाही! मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विरोधकांचा दावा खोडून काढला

भुयारी रस्तासंबंधी चर्चा करून अंतिम निर्णय : वास

वास म्हणाले की, उपासनगर येथे रस्ता क्रॉस करतेवेळी नागरिकांना तसेच वाहनचालकांना मोठा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यासाठी तेथे भुयारी रस्त्याची मागणी रहिवाशांकडून होत आहे. तेथे फूटब्रिज बांधण्याचा प्रस्ताव चांगला आहे.

तेथे भुयारी रस्तासंबंधी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येईल. उपासनगर येथे महामार्गात नव्याने बदल करताना आपणास विश्वासात घेतले नाही. संबंधितांनी आपणास व इतरांना विश्वासात घेण्याची गरज होती. जेणेकरून तेथील समस्या निर्माण झाली नसती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news