Ponda Dengue Case | फोंड्यात मे मध्ये तब्बल 10 हून अधिक डेंग्यू रुग्ण

Ponda Dengue Case | उन्हाळ्यातच रुग्ण सापडल्याने भीती व्यक्त; उपाय राबविण्याची मागणी
Dengue outbreak risk |
Dengue outbreak risk | ‘अल निनो’मुळे आता ‘डेंग्यू’च्या डंखांचाही ताप वाढणार!File Photo
Published on
Updated on

फोंडा : पुढारी वृत्तसेवा

फोंड्यात एका महिलेचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याने परिसरात भीती पसरली असून शहर तसेच इतर परिसरात डेंग्यूचे रुग्ण वाढतच चालल्याने आरोग्य खात्याने प्रभावी उपाययोजना क करण्याची मागणी होत आहे. गेल्या मे महिन्यात १० पेक्षा जास्त डेंग्यू रुग्णांची नोंद झाली आहे.

Dengue outbreak risk |
Maharashtra Maternal Mortality:महाराष्ट्रात 971 मातामृत्यू; घट असूनही हा आकडा तज्ज्ञांना चिंताजनक का वाटतो?

फोंडा शहर परिसरात खडपाबांध तसेच तिस्क, वरचा बाजार, दुर्गाभाट, कुर्टी व इतर परिसरात डेंग्यूचे रुग्ण सातत्याने आढळत असल्याने लोकांत भीती पसरली आहे. डेंग्यूबाधीत रुग्णांना फोंडा आयडी उपजिल्हा इस्पितळ आणि खासगी इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्याचे सत्रच सध्या सुरू आहे.

Dengue outbreak risk |
Rising temperature | आक्रोश जळत्या पृथ्वीचा

एरवी पावसाळ्यात दरवर्षी फोंडा तालुक्यांत डेंग्यू रुग्ण सापडतात. मात्र, यंदा ऐन उन्हाळ्यातच डेंग्यू रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत असल्याने पावसाळ्यात काय स्थिती असेल, अशी विचारणा फोडावासीयांकडून केली जात आहे. फोंडा तसेच कुर्टी व इतर पंचायत क्षेत्रात गटारे प्राण्याने तुंबली आहेत. बऱ्याच ठिकाणी गटारांची साफसफाई झालेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news