CRZ Demolition Drive | मोरजी तेमवाड्यात उच्च न्यायालयाच्या आदेशाने सलग तिसऱ्या दिवशी तोडफोड कारवाई! मोठा पोलीस बंदोबस्त तैनात"

CRZ Demolition Drive | मोठा पोलीस बंदोबस्त; कोणताही अनुचित प्रकार नाही
CRZ Demolition Drive
CRZ Demolition Drive
Published on
Updated on

पेडणे : पुढारी वृत्तसेवा

तेमवाडा-मोरजी येथील किनारी भागात सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून उभारण्यात आल्याचा आरोप असलेल्या बांधकामांवर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारी यंत्रणेची तोडफोड कारवाई बुधवारी (दि. २२) तिसऱ्या दिवशीही सुरू राहिली.

CRZ Demolition Drive
Goa Water Metro | "गोव्यात धावणार 'वॉटर मेट्रो'! सविस्तर अहवालासाठी कोची मेट्रोला 5.88 कोटींचा निधी मंजूर"

संबंधित जमीनमालकाच्या तक्रारीनंतर न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार ही कारवाई करण्यात येत असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

यापूर्वी दिलीप मोरजे यांच्या मालकीची तीन लहान बांधकामे पाडण्यात आली होती. त्यानंतर तिसऱ्या दिवशी आणखी एका बांधकामावर कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान महसूल, सीआरझेड आणि इतर संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कारवाईमुळे संबंधित कुटुंबावर मोठा मानसिक ताण निर्माण झाल्याचे दिसून आले. दिलीप मोरजे तसेच त्यांचा मुलगा ध्रुव मोरजे हे सध्या पोलीस कोठडीत आहे. कुटुंबातील मुलगी दुखापत झाल्याने घरी उपचार घेत असल्याचे सांगण्यात आले.

त्यामुळे बांधकामांमधील साहित्य वेळेत हलवणे कुटुंबाला शक्य झाले नसल्याचे स्थानिकांनी सांगितले. काही ठिकाणी सामान आत असतानाच सरकारी यंत्रणेने तोडफोड सुरू ठेवल्याचेही स्थानिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, संपूर्ण कारवाई शांततेत पार पडली. मागील दोन दिवसांप्रमाणे कोणताही अनुचित प्रकार घडला नसतानाही मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

जखमी दीपिका मोरजे यांची गोवा फॉरवर्डकडून भेट

तेमवाडा-मोरजी येथील किनारी भागात सीआरझेड नियमांचे कथित उल्लंघन करून उभारण्यात आलेल्या बांधकामांवरील उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तोडफोड कारवाई तिसऱ्या दिवशीही सुरू असताना गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते दीपक कळंगुटकर यांनी जखमी दीपिका मोरजे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली.

CRZ Demolition Drive
Rashi Bhavishya Today: आज 'या' राशीच्या व्यक्तींचा खर्च वाढण्याची शक्यता; पाहा तुमची रास काय सांगते?

काही दिवसांपूर्वी याच परिसरात एका वकिलावर हल्ला झाल्याची तक्रार मांद्रे पोलिसांत दाखल झाली होती. त्यानुसार दिलीप मोरजे आणि त्यांचा मुलगा ध्रुव मोरजे यांना अटक करण्यात आली असून, दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत.

दुसरीकडे, दीपिका मोरजे यांनी संबंधित वकिलाविरुद्ध आपल्या पायावर वाहन घालून दुखापत केल्याची तक्रारही मांद्रे पोलिसांत दाखल केली आहे. त्या सध्या माहेरी उपचार घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news